Vikhe Patil criticizes Ajit Pawar
Vikhe Patil criticizes Ajit Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

उद्या बघा काय होतंय...महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत विखे पाटलांचा गौप्यस्फोट 

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर: महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टी व शिवसेना या युतीलाच कौल दिला आहे आमचा सूर्य योग्य ठिकाणीच उगवला आहे. अपघाताने सत्तेवर आलेल्यांच्या भाषणावर मी काय टीका करणार, असा टोमणा खासदार सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. 

अजितदादा काय म्हणालेले
दोन दिवसांपूर्वी कर्जत येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विखे पाटील कुटुंबाच्या पक्षांतराबाबत भाष्य केले होते. ते तिकडे गेले आणि सूर्य इकडे उगवला, असे म्हणत मिश्कीली केली होती. त्याला डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. 

ढोकी(ता.पारनेर) येथे "खासदार आपल्या दारी" उपक्रमानंतर खासदार विखे पाटील यांनी पत्रकारांशी सवांद साधला. त्यावेळी त्यांनी वरील टोमणा मारला. 

काहीजण सत्तेसाठी आले

विखे पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी पक्षात जे प्रवेश झाले ते सत्ता येईल, या अपेक्षेने झाले, मात्र आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवली. परंतु आम्हाला सुडबुदधीने लोकसभेचे तिकीट नाकारले. आम्ही सत्तेच्या पाठीमागे पळत नाहीत. जिल्ह्यातील जनतेने कायम आम्हाला स्वीकारले आहे. 

लोकसभेवेळी आम्हाला भाजपाने आधार दिल्याने आम्ही हा पर्याय स्वीकारला. अपवादात्मक आलेले सरकार टिकत नसते. कर्नाटकमध्ये काय झाले, आता मध्यप्रदेशमध्ये काय होणार आहे, हे आपण सर्व पाहणारच आहात, महाराष्ट्रातही सत्ता लवकरच येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत अतिशय उत्तम आहे. सरकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविल्या जाव्यात. या करीता खासदार आपल्या दारी उपक्रम राबवित आहोत, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT