parekarwadi.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्‍यातील हे गाव बनले "खिंडारमुक्त' 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली)-  पारेकरवाडी (ता. आटपाडी) येथे ग्रामपंचायतीने गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी "खिंडार मुक्त गाव' अभियान राबवले. तीन दिवसांत गावातील 45 वर पडकी घरे आणि चिलार काढून जागा स्वच्छ केल्या. या खिंडार मुक्त अभियानला आटपाडी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कौतुक केले. 


पारेकरवाडी आटपाडी तालुक्‍यतील छोटेसे गाव. इतर गावांप्रमाणेच येथेही जागोजागी मोकळ्या जागा, चिलारीची झाडे वाढली होती. अनेक जुनी घरेही पडलेल्या अवस्थेत होती. या जागांचा वापर केला जात नव्हता. या जागा म्हणजे कचरा टाकण्याचे उकीडडे बनले होते. सरपंच नारायण हांडे, ग्रामसेवक अभिजीत माने आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात खिंडार मुक्त गाव अभियान तीन दिवस राबवले.

जेसीबीच्या साह्याने 45 पडकी घरे आणि जागोजागी असलेली चिलारीची झाडे काढली. 19 हजार 500 रुपये खर्च आला. प्रत्येक पडक्‍या घरासाठी सरासरी 450 रुपये एवढा खर्च आला. सारा खर्च ग्रामपंचायतीने केला. गावचे रूपडे बदलून गेले आहे. पडकी घरे आणि चिलार काढल्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ मैदान तयार झालेय. या अभियानला पंचायत समितीच्या सभापती भूमिका बेरगळ, जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर आणि गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. अभियानचे साऱ्यांनीच कौतुक करून तालुक्‍यातील अन्य गावांनीही पारेकरवाडीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT