The village decided not to make political band 
पश्चिम महाराष्ट्र

या गावाने ठरवलेय राजकीय बंद पाळायचा नाही

सकाळवृत्तसेवा

शिराळा : कोणताही राजकीय बंद पाळायचा नाही, असा निर्णय शिराळा व्यापारी महासंघाने एकमुखाने घेतला आहे. त्याबाबत नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन यांना व्यापारी संघटनेमार्फत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, की वारंवार राजकीय संघर्षांतून व विविध मागण्यांसाठी वारंवार व्यापार बंद ठेवला जातो. सध्या व्यापाराची अवस्था बिकट आहे. अनेक व्यवसाय बंद पडत आहेत. त्यातच हे "बंद' चे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे व्याप्रायांचे आर्थिक नुकसान होत आहे. यापुढे राजकीय संघटनेच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. जर कोणात्या संघटनेला बंद पाळायचा असेल तर त्यांनी लेखी संघटनेस कळवले पाहिजे, अचानक बंद पुकारला तर त्यास विरोध केला जाईल, असे ठरले.

सर्व प्रकारच्या विक्रेत्यांची एकत्र संघटना तयार करण्यात आली. काही कारणाने बंद ठेवणे आवश्‍यक असेल, तर दुपारी एक वाजेपर्यंत बंद पाळण्यात येईल, बंदबाबत संबंधित संघटना व व्यक्तीचे लेखी पत्र, विविध संघटनेकडून मागण्यात येणाऱ्या देणग्या वैयक्तिक कोणी देऊ नये याबाबत व्यापारी महासंघ निर्णय घेईल, शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत व व्यवस्थित करण्यासाठी नगरपंचायत व पोलीसांचे सहकार्याने नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात यावी. 

संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, विश्वास कदम, एम. डी. गायकवाड, दिलीप सोनटक्के, विजयराव कुलकर्णी, उद्धव खुर्द, उमेश कुलकर्णी, किशोर यादव, चेतन पाटील, नितीन शहा, विपुल शहा, संदीप मुळे, योगेश सवाईराम, अमित गायकवाड, सचिन यादव, रमेश यादव, वैभव हसबनीस, सचिन परदेशी, विलास गायकवाड, वैभव गायकवाड, मेघश्‍याम आवटे व विविध विक्रेता संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

Hockey Tournament: 'चीनमधील स्पर्धेत सातारकर खेळाडूंची चमकदार कामगिरी': हॉकीपटू वैष्णवी, ऋतुजाचे ‘चक दे इंडिया’; भारतीय संघाचे यश

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT