karhad-rains.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

तांबवे गावात चौबाजुने शिरले पाणी; ग्रामस्थ अ़डकले

हेमंत पवार

कऱ्हाड : तीन दिवसापासुन गावात कृष्णा, कोयना नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही आहे. गावाच्या चारीबाजुने पाणी साचल्याने तांबवे (ता.कऱ्हाड) गावात दैना उडाली आहे. गावामध्ये २००५ च्या महापुरापेक्षाही भयंकर स्थिती झाली असुन गाव संपर्कहीन होवुन बेटासारखी स्थिती झाली आहे. बाजारपेठेत निम्या गावात पाणी घुसल्याने ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही पाणी वाढत असल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. 

तांबवे गावचा जुना पुल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो म्हणुन शासनाने तेथे नवीन पुल उभारला. मात्र तोही पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर गावाला जोडणारा किरपे आणि डेळेवाडी मार्गही पाण्याखाली गेल्याने त्या गावाची बेटासारखी स्थिती झाली आहे. तीन दिवसापासुन गावात पाणी घुसुन गावच्या चारीबाजुने पाणी असल्याने गावातील लोकांना बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. गावातील रुग्णांनाही बाहेर काढणे मुश्कील बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Jalna News: मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका; सावळा गोंधळ, मंठा तालुक्यातील घटना

कोण होते अयातुल्लाह अली खामेनेई? ४ दशकांपासून इराणची सत्ता हातात, अमेरिकेला मानायचे नंबर एकचा शत्रू

Caste-based discrimination : जातिभेद का संपला नाही?

Shyam Manohar Books Marathi : हत्या आणि माणुसकीचा संघर्ष!

SCROLL FOR NEXT