1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

गावातील लोक झाले दक्ष 

सकाळवृत्तसेवा

नवेखेड (सांगली) : कोरोना विषाणूची धास्ती रोखण्यासाठी गाव गाडे आता सज्ज झाले आहेत. इस्लामपुरात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळल्याने आसपासच्या गावातील लोक याबाबत दक्ष झाले आहेत. काल रात्री ही घटना कळल्यानंतर इस्लामपूर भोवतालची खेडी अधिक गांभीर्याने या घटनेने पाहू लागले आहेत. 

लोकांनी उत्स्फूर्तपणे गावोगावी कोरोना जनजागृतीसाठी बैठका घेतल्या प्रशासनाच्या आदेशाशिवाय ग्रामस्थांना आता आपले आरोग्य व त्याची काळजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गावोगावी झालेल्या बैठकीत गावाला जोडणारे सर्व रस्ते आज सकाळपासून बंद करण्यात आले होते. 

महत्वाची असेल तर बाहेर सोडले जात होते. अनोळखी लोकांना प्रवेश दिला जात नव्हता मुंबई-पुणे या ठिकाणाहून गावात आलेल्या लोकांची तपासणी केली जात होती कोरोना प्रतिबंधक औषधांची नवेखेड गावात फवारणी करण्यात आली. 

बोरगावात बोरगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घराबाहेर पडू नये आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन केले. हुबालवाडी येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेत गावाला जोडणारे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी आज घरा बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्‍टर संदीप कोडग हे दिवसभर रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होते बाहेरगावाहून आलेल्या लोकांची यादी बनविण्याचे काम सुरू होते. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दवाखान्यात येताना मास्क कंपल्सरी होता त्याचबरोबर हात धुण्यासाठी पाणी व साबण उपलब्ध होते.जुनेखेड रेठरेहरणाक्ष मसुचीवाडी गौड वाडी साटपेवाडी फारणेवाडी बनेवाडी ताकारी या परिसरातही आज दिवसभर लोकांनी कडकडीत बंद पाळून घरातच राहणे पसंत केले गावगाड्यातील लोक विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी स्वतःहून सक्रिय झाले आहेत 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

SCROLL FOR NEXT