पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेने केली विनय कोरे यांच्या "जनसुराज्य' ची पंचाईत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जिल्ह्यातील 10 पैकी 8 मतदारसंघांतील थेट उमेदवारच जाहीर करून भारतीय जनता पक्षासोबत आघाडीच्या तयारीत असलेल्या "जनसुराज्य'चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांचीच पंचाईत केली आहे. 

भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्याने जिल्ह्यातील चार जागांची मागणी केलेल्या श्री. कोरे यांच्यासमोर आघाडीचा पर्याय आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून श्री. कोरे भाजपसोबत आहेत. त्यांच्या कारखान्यालाही अलिकडेच सरकारने आर्थिक मदत केली आहे. या जोरावर विधानसभेच्या राज्यातील 9 जागा श्री. कोरे यांनी भाजपकडे मागितल्या होत्या. त्यात जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, हातकणंगले व चंदगडच्या जागेचा समावेश होता. 15 दिवसांपूर्वी श्री. कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाही केली होती. युतीचा निर्णय झाल्यानंतर विचार करण्याचे आश्‍वासन श्री. कोरे यांना मिळाले होते. 

युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने थेट मुंबईत बोलवून आठ जागांवरील उमेदवारांना पक्षाचे ए, बी फॉर्मच देऊन इरादा स्पष्ट केला. त्यात सहा विद्यमान आमदारांचा समावेश आहे. युती झाली नसती तर भाजपकडून श्री. कोरे यांना चार जागा मिळण्याची शक्‍यता होती; पण ज्या जागा मिळणार होत्या, त्याच जागेवर सेनेने उमेदवार जाहीर करून त्यांची पंचाईत केली आहे. आता भाजपच्या विरोधात जाऊन काही जागा लढवाव्यात तरी पंचाईत आणि शांत बसणे हेही अडचणीचे, अशी विचित्र कोंडीही श्री. कोरे यांची झाली आहे. 

...तर शाहूवाडीत आघाडीचा पाठिंबा शक्‍य 
या परिस्थितीत श्री. कोरे यांच्यासमोर एक तर स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही किंवा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत त्यांना जावे लागेल. आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा आल्या आहेत. कॉंग्रेसकडे चार मतदारसंघांत तर प्रबळ उमेदवारच नाहीत. त्यात शाहूवाडीचा समावेश आहे. आघाडीचा पाठिंबा श्री. कोरे यांना देऊन त्यांची इतर मतदारसंघातील मदत मिळवण्याचा प्रयत्न आघाडीकडून होण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी श्री. कोरे यांच्याकडून हातकणंगले, चंदगडच्या जागेची मागणीही आघाडीकडे होऊ शकते. शाहूवाडीत श्री. कोरे यांना मदत करून इतर ठिकाणच्या जागा त्यांना सोडण्याचा जुगार आघाडीकडून अशक्‍य आहे. अशा परिस्थितीत शाहूवाडीसह हातकणंगले, शिरोळ व चंदगडमध्ये "एकला चलो रे' अशीच श्री. कोरे यांची भूमिका असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT