PETROL.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आदेशाचा भंग : आष्ट्यात पेट्रोलपंप मालकावर गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

आष्टा (सांगली)- पेट्रोल पंपावर खासगी वाहनधारकांची गर्दी करून त्यांना पेट्रोल-डिझेलची विक्री करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा प्रकार येथील मे.एन ए रुकडे पेट्रोलपंपावर घडला. याप्रकरणी पेट्रोल पंपचे मालक आप्पासाहेब नाभीराज रुकडे व व्यवस्थापक राजू नर्गिस नायर (रा. फाळकेवाडी) यांच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार संजय सनदी यांनी फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "कोरोना' या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. गेले काही दिवस पेट्रोल पंपावर गर्दी होत असल्याचे पाहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 25 मार्चपासून 31 मार्च पर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री करण्यास बंदी लागू केली आहे. त्याबाबत सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली तर कारवाईचा इशारा देखील दिला आहे. 


आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, सहाय्यक फौजदार संजय सनदी हे सोमवारी (ता.29) पेट्रोलिंग करत असताना आष्टा परिसरातील मे. रुकडे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी झाली होती. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर दुचाकी आणि चार चाकी खासगी वाहन चालकांना पेट्रोल वितरण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसानी व्यवस्थापक राजू नायर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांच्याकडे दुर्लक्ष करीत पेट्रोल भरणे सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापक यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

पेट्रोल-डिझेल विक्री सुरू केल्याप्रकरणी पंपाचे मालक आप्पासाहेब रुकडे व व्यवस्थापक राजू नायर यांच्यावरती भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईची आष्टा परिसरात चर्चा रंगली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT