Dr. Suresh Bhosle 
पश्चिम महाराष्ट्र

पहा शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि.सातारा) : कोरोनामुळे सध्या लॉकडाउन सुरू आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यापीठांनी संबंधित अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा झाल्यानंतर 180 दिवसात दीक्षांत सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे आवश्‍यक असते. परंतु कोरोना काळात जाहीर पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करणे शक्‍य नाही. त्यामुळे कृष्णा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने व्हर्च्युअल पद्धतीने दीक्षांत सोहळा घेतला.

त्यानुसार आज सकाळी साडे अकरा वाजता कृष्णा विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल दीक्षांत सोहळ्याला प्रारंभ झाला.

सोहळ्यात कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या कराड येथील मुख्य कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुलपती डॉ. भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य अतुल भोसले, विनायक भोसले, डॉ. दीपक टेम्पे, डॉ. सबिता राम, मनिषा मेघे, कुलसचिव डॉ. एम.व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सौ.आर.के. गावकर, वित्त अधिकारी पी.डी. जॉन, संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबुड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी.के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए.वाय. क्षीरसागर, मेडिकल ऍडमिनिस्ट्रेटर डॉ. आर.जी. नानिवडेकर, दिलीप पाटील सहभागी झाले. नागपूर येथून विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा व कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा सहभागी होते. विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि डीन ऍकॅडेमिक्‍स हे देखील सहभागी झाले होते.

दीक्षांत सोहळ्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विविध विभागातील 652 विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पदवी, पदविका प्रदान झाल्या. त्यात वैद्यकीय विज्ञान विभागातील 307, दंतविज्ञानच्या 107, फिजिओथेरपीच्या 85, नर्सिंगच्या 126 आणि अलाईड सायन्स विभागातील 27 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका देण्यात आली. यापैकी वैद्यकीय विज्ञान अधिविभागातून 11 जणांना पीएच. डी पदवी देण्यात आली.

सद्यस्थिती पूर्ववत झाल्यानंतर काही काळाने नियमित विस्तारित दीक्षांत सोहळा आयोजित होईल. त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. नियमित विस्तारित दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या पदवी प्रदान आणि पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार, पदक आणि पारितोषिके देखील प्रदान केली जाणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT