Vittal BIrdev Yatra Pattankodoli 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पट्टणकोडोली यात्रेस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

पट्टणकोडोली - विठ्ठल बिरोबाच्या नावानं चांगभलं... असा गजर करीत, लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस आज प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा संपन्न झाला. भाविकांनी उधळलेल्या भंडार्‍याने संपूर्ण गावालाच झळाळी आली होती. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या बरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा व उत्तर प्रदेश आदी राज्यांतून लाखो भाविकांनी येथे हजेरी लावली होती. आज सकाळी परंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गाव चावडीमध्ये मानाच्या तलवारींचे पूजन करण्यात आले. तलवारींसह प्रकाश पाटील ( काका), रणजित पाटील - गावडे, कुलकर्णी, आवटे, जोशी, चौगुले आदि मानकरी व धनगर समाजाचे पंच मंडळी फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले. वाजत - गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भानस मंदिर, कल्लेश्वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ आली. या गादीवर विराजमान असलेल्या फरांडेबाबांना अलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले.

हे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा (खेलोबा वाघमोडे) दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य (तलवारीने पोटावर वार करीत) केले. यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी विठ्ठल बिरोबाच्या जयघोषात फरांडेबाबांच्या अंगावर भंडाऱ्याची, खारीक, खोबरे व बाळ लोकर यांची मुक्तहस्ते उधळण केली.

या भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर सुवर्णमय झाला होता. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी परिसरातील इमारती, झाडे, घरांची छपरे यांचा आधार घेतला होता. मानाच्या शेकडो छत्र्या फिरवत भाविक जणू मंत्रमुग्धच होऊन गेले होते.

यात्रा परिसरात विविध व्यावसायिक, करमणुकीचे खेळ, पाळणेवाले यांनी विद्युत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध गाणी आणि कल्पक जाहिराती केल्याने सारा परिसर दुमदुमून गेला आहे. घोंगडी, कांबळ्यांची दुकाने, ढोल, ढोलाच्या कड्या यांचा मोठा बाजार भरला आहे. नेपाळी व्यावसायिकांनी उबदार कपडय़ाचे (स्वेटर्सचे) भली मोठी दुकाने रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. टनाच्या प्रमाणात पट्टणकोडोली येथे भंडारा आलेला होता. भाविकांच्या उधळणीनें भंडाऱ्याचा खचच्या खच रस्त्यावर पडलेला आहे.

नारळ, भंडारा, खोबरे यांचे बरोबरच अनेक विविध वस्तूंची खरेदी विक्री यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल मोठी होत आहे. आज भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला असला तरी यात्रा अजून चार दिवस चालणार आहे. रविवार (ता. 20) रोजी भर यात्रा, नैवेद्य, तिसरी व चौथी पालखी सोमवार (ता. 21) रोजी फुटयात्रा पाचवी शेवटची पालखी.

श्री विठ्ठल बिरदेवाची भाकणुक -
प्रजन्य - सात दिवसात पाऊस लागेल. रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल.
राजकारण - गोंधळ माजेल.
तांबडं धान्य - कडक होईल.
रोगराई - सेवा करिल तो वाचेल. अहंकार करेल तो वर जाईल.
धान्य - दोन सव्वा दोन मनाने पिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT