Voter
Voter 
पश्चिम महाराष्ट्र

काम करणाऱ्यांचा सन्मान, न करणाऱ्यांवर कारवाई!

सिद्धार्थ लाटकर

सातारा - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) सन्मान, तर कामात कुचराई करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कारवाईचा इशारा जिल्हा निवडणूक शाखेने दिला आहे. 

एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोन हजार ९७० मतदान केंद्रांवर ‘बीएलओं’च्या माध्यमातून मतदारांचे नाव वाढविणे, वगळणे, दुरुस्ती करणे, स्थलांतर करणे आदी प्रकारचे अर्ज (रविवारी) भरून घेण्यात येत आहेत. हे काम जिल्ह्यात सर्वत्र उत्तमरीत्या सुरू आहे. हे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी ग्रामसभा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे, बचत गट, महिला मंडळांच्या बैठकांबरोबरच दिव्यांग मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) कामगिरी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे उत्तम कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे, तसेच मतदान केंद्रांवर सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘बीएलओं’नी उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. ‘बीएलओ’ नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर गैरहजर राहिल्यास, जागेवर नसल्यास अथवा त्यांचे मतदान नोंदणीचे काम असमाधानकारक आढळल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांची अनास्था...
जिल्हा निवडणूक शाखेने राजकीय पक्षांबरोबर बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नेमण्यासाठी दोनदा पत्रव्यवहार केला; परंतु महाबळेश्‍वर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) व पाटण (शिवसेना) या तालुक्‍यांतून अनुक्रमे ११४ व ५० अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त अद्याप अन्य तालुक्‍यांतून कोणताही प्रतिसाद नाही. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असूनही ‘बीएलए’बाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT