Voters should participate in elections for strengthening democracy: Collector Dr. Abhijit Chaudhary 
पश्चिम महाराष्ट्र

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारांचा निवडणुकीत सहभाग हवा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

विष्णू मोहिते

सांगली : ः भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून निकोप लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य अधिकार आहे, असे सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे. लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळाली आहे.

मतदान करत असताना गुणवत्ता आधारित मतदान व्हावे. ज्यांची नावे मतदार यादीत नोंद झालेली नाहीत अशांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नवमतदारांनी प्रोत्साहित करावे. ग्रामीण भागात मतदानाचा टक्का शहरी भागापेक्षा जास्त असतो. त्याप्रमाणे शहरी भागातील मतदानाची टक्केवारीही वाढावी यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. इपिक कार्डाची पीडीएफ कॉपी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर म्हणाले,""1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 24 हजार 753 नवीन मतदारांची नोंद झाली असून यामध्ये 18 ते 19 या वयोगटातील 9 हजार 111 मतदार आहेत. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व दुबार अशा एकूण 15 हजार 455 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष 12 लाख 31 हजार 378, स्त्रिया 11 लाख 59 हजार 89, तृतीय पंथी 70 असे एकूण 23 लाख 90 हजार 537 मतदार आहेत. ही मतदार यादी ceo.maharashtra.gov.in व sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सांगितले. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी मानले. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT