Voting today for sangli market committee election Mahavikas Aghadi BJP 90 candidates for 18 seats esakal
पश्चिम महाराष्ट्र

Market Committee Election : बाजार समितीसाठी आज मतदान

महाविकास आघाडी, भाजपमध्ये चुरस; १८ जागांसाठी ९० उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २८) मतदान होत आहे. बाजार समितीचे ८ हजार ६७५ मतदार ९० उमेदवारांतून १८ संचालकांसाठी मतदान करतील. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील २४ केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असून या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांचे भवितव्य ठरणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बाजार समितीची निवडणूक अडीच वर्षे लांबणीवर पडली होती. मिरज, कवठेमहांकाळ व जत या तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली बाजार समितीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गेल्या आठ दिवस आरोप-प्रत्यारोपानंतर उद्या मतदान होत आहे. शनिवारी (ता. २३) मिरजेत मतमोजणी होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. समितीच्या १८ जागांसाठी प्रचाराचे रान पेटले होते. महाविकास आघाडी व भाजप पॅनेलने प्रत्येकी १५ जागेवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, व्यापारी गटातील दोन आणि हमाल गटातील एका जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

बाजार समितीच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी होत्या, सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात भाजप नेत्यांनी आरोपांची राळ उठवली. महाविकास आघाडीने भाजप नेत्यांवर पलटवार केला होता.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समितीची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची ठरणारी असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

महाविकास आघाडीने वसंतदादा शेतकरी विकास पॅनेल तर भाजपने शेतकरी परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. निवडणूक दुरंगी होत असल्याचे दिसत असले तरी तिसऱ्या आघाडीही मैदानात आहे. बाजार समितीसाठी महाविकास आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे नेतृत्व पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप करीत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रशासकीय तयारी पूर्ण....

बाजार समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवरील तयारीही पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी दिली. मतदानासाठी १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.

हे महत्त्वाचे...

  • बाजार समितीच्या एकूण जागा - १८ (ग्रामपंचायत- ४, सोसायटी- ११, व्यापारी २ व हमाल १)

  • रिंगणातील उमेदवार - ९०

  • मतदान केंद्र - २४

  • सांगली - ८ ( दामाणी हायस्कूल- व्यापारी, आडते, हमाल )

  • मिरज -४ ( मिरज हायस्कूल - समिश्र)

  • कवठेमहांकाळ - ५ (जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, संमिश्र)

  • जत - ७ (जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ - संमिश्र)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Mumbai Local Megablock: रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसे असेल वेळापत्रक?

Live Updates Marathi : खड्डेमय रस्त्यांचा आणखी एक बळी, ३९ दिवसांच्या झुंजीनंतर आजींचा मृत्यू

Brazil Football: ब्राझीलचा फुटबॉल संघ भारतात येणार? कोलकात्यात रंगू शकतो मेगा सामना; रिपोर्टने वाढवल्या चाहत्यांच्या आशा

PM Modi Latest Video : 'या' एका व्हिडिओमुळे इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी ट्रेंडिंग; १२ तासात वाढले १.१ मिलियन फॉलोअर्स

SCROLL FOR NEXT