Waghati plant's has become rare... used to break the fast of Ekadashi 
पश्चिम महाराष्ट्र

वाघाटीचा वेल झाला दुर्मिळ... एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वापर

गजानन पाटील

पेड (जि . सांगली) : आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढली जाणारी वाघाटी हे फळ आता काळाच्या ओघात नामानेष होत चालले आहे. शेताच्या बांध, परसबागेतील झाडावरील वाघाटीचा वेल आता सिमेंटच्या जंगलात दुर्मिळ झाले आहे. सध्या ग्रामीण भागात वाघाटीचा दर हा 100 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. 

आषाढी एकादशी उजाडली की, उपवास धरणाऱ्या वारकऱ्यांना वाघाटी (गोविंद फळ) हिरव्याकंच फळांचे वेध लागतात. उपवास सोडताना ही भाजी खाण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत ही फळे तयार होतात. नंतर ती तोडून बाजारात विक्रीस आणली जातात. परंतु अलीकडे तर वाढत्या वृक्षतोडीमुळे वाघाटी या फळाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.

पाणंद, ओढ्याच्या काठावर असणारी दाट झाडीत वाघाटीचे वेल फुलतात. इतर झाडावर वाढणाऱ्या वाघाटीच्या झळकट काटेरी वेलाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे वाघाटीचा वेल पुढील येणाऱ्या पिढीला माहिती व्हावा, आषाढी एकादशीनिमित्त त्याचे महत्व टिकावे आणि निसर्गातील अन्नसाखळी अबाधित राहावी, याकरिता वाघाटचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. हा वेल आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाचा आहे, पण फुलपाखरांच्या जीवनचक्रातही वाघाटी महत्वाची आहे.

या फळाचा भाजी प्रकारात समावेश होत असला तरी वाघाटीचा वेल रुजवणे त्यांचे संवर्धन करणे, त्यापासून फळांचे उत्पन्न घेणे शक्‍य नाही. हा वेल नैसर्गिकरीत्या गर्द झाडीत वाढतो. आषाढी एकादशी आली की, मगच सर्वांना वाघाटीची आठवण येते. आताच्या नवीन पिढीला तर या वाघाटी विषयी फारशी माहिती नाही. 

आयुर्वेदिक महत्त्व 
वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे. श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे, डोके आणि चेहऱ्यावरील चेतापेशीत तीव्र वेदना होणे, लहान मुलांमध्ये वाऱ्यांमुळे निर्माण होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात कंट सुटणे व दुखणे, विषारी द्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळने, ताप उतरवणे, हगवण लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर, सर्दी, खोकला, अनेक विषाणुजन्य आजार, याच बरोबर अनेक प्रजातींच्या कृमिचा नाश होण्यासाठी वाघाटीची फळे, पाने व मुळे यांचा वापर केला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT