rail track.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज रेल्वे स्थानकावर आदेशाची प्रतीक्षा

सकाळवृत्तसेवा

मिरज- सांगली जिल्ह्यातील परप्रांतीयांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी केली आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या आदेशाची रेल्वे प्रशासनास प्रतिक्षा आहे. या आदेशानंतर किमान पन्नास तासांनी या दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत.


सांगली जिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर सध्या गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी उत्तर आणि दक्षिण या दोन दिशांना मिरज मधून दोन गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवली आहे. या दोन्ही गाड्यांंमध्ये कदाचित सोय आणि जागेच्या उपलब्धतेनुसार कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांचीही सोय करता येणे शक्य आहे का याचाही अभ्यास राज्य सरकारच्या प्रशासनाकडून सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान चर्चा आणि पत्र व्यवहार झाल्यानंतर याबाबतचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनास याबाबतचा आदेश मिळाल्यानंतर मिरज रेल्वे स्थानकातील उपलब्ध डब्यांची देखभाल दुरुस्ती करून या दोन गाड्या दोन दिशांना जाण्यासाठीचा हिरवा कंदील रेल्वेकडून दाखवण्यात येईल.

सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सध्या कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, यासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील कामगार मोठ्या संख्येने काम करतात. हे सर्वजण सध्या आपापल्या गावी जाण्यासाठी आतुर झाले आहेत. हे सर्व कामगार सध्या लॉकडाऊनमुळे आपापल्या कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यापैकी शेतकरी, कारखानदार, आणि व्यापाऱ्यांकडे कामाला असलेल्या कामगारांना संबंधितांनी सांभाळले आहे. त्यांच्या जेवणाखाण्यासह निवासाची व्यवस्था ही या सर्वांनी केली आहे. तर ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत. या पैकी हजारो कामगारांना सोडून त्यांचे ठेकेदार पसार झाले आहेत. तर ज्यांना आतापर्यंत शेतकरी कारखानदारांनी सांभाळले आहे त्या शेतकरी कारखानदारांनाही यापुढे याच कामगारांचा सांभाळ करणे जिकिरीचे झाले आहे.

अनेक ठिकाणी तर याच परप्रांतीय कामगारांची लोकाश्रयावरच गुजराण सुरू आहे यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने या कामगारांना आपापल्या गावी पोहचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालीस अनुसरून मिरज मधून दोन गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवली आहे. यासाठी आवश्यक आदेश प्राप्त होताच. मध्य रेल्वेचे प्रशासन डब्यांची जुळवाजुळव करून या दोन गाड्या पाठवू शकते. ह्या दोन गाड्या तयार करण्यासाठी मात्र रेल्वे प्रशासनास किमान 48 ते 50 तासांचा अवधी आवश्यक आहे. यासाठीचे डबे आणि अन्य तांत्रिक बाबीचींं पूर्तता करूनच या दोन गाड्या सोडल्या जाऊ शकतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT