Warning alerts about "Corona" virus
Warning alerts about "Corona" virus 
पश्चिम महाराष्ट्र

"करोना' विषाणूबाबत सांगलीत अलर्ट

प्रकाश निंबाळकर

सांगली : चीनमध्ये हुबेई प्रांतातील कहान शहरात न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून या न्यूमानियाचे कारण नव्या प्रकारच्या करोना विषाणू (Novel Corona Virus 2010-nCov) असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभर हाय अलर्ट देण्यात आले आहे. आपल्याकडे गंभीर धोका नसला तरी दक्षता म्हणून केंद्रासोबत राज्य शासनानेही सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणांना मागर्दशक सूचना दिल्या आहेत. 

दरम्यान, याबाबत सांगली जिल्हा आरोग्य यंत्रणेसही आरोग्य संचलकांचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने यंत्रणा सक्षम केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी यांनी दिली.

इन्फल्यूएंजा सदृश्‍य रुग्ण (ILI) आणि श्‍वसनसंस्थेच्या तीव्र प्रादुर्भाव(SARI) या आजारांचे सर्वेक्षण सर्व आरोग्य संस्थांनी करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक जिल्ह्यासह महापालिकेने कार्यक्षेत्रातीाल खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना माहिती द्यावी. जिल्हास्तरावर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था येथे प्रयोगशाळा निदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या तरी nCov विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्‍यता कमी दिसते तथापि, इन्फुल्यूएंजा सदृश आजाराच्या तसेच श्‍वसन संस्थेच्या तीव्र आजाराच्या रुग्णांनी व नातेवाईकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेचे प्रबोधन करावे. स्वाईन फ्ल्यू संदर्भात उपलब्ध आरोग्य शिक्षणविषयक साहित्याचा वापर करावा. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सर्व प्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक कार्यक्षम करून नव्याने उद्‌भवलेल्या या दोन विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, असे आदेश आरोग्य सचिवांमार्फत देण्यात आले आहेत. 

प्राथमिक लक्षणे :

  • 5 वर्षांवरील वयोगट : अचानक येणारा तीव्र ताप (>38c), खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्‍वासास अडथळा 
  • 5 वर्षांखालील वयोगट : न्यूमोनिया अशी लक्षणे दिसल्या तत्काळ तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

शल्य चिकित्सक नोडल अधिकारी

करोना व्हायरससंदर्भात प्रबोधन आणि सर्वेक्षण करण्याचे राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. काही आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. 

-डॉ. बी. एस. गिरीगोसावी, जिल्हा आरोग्य अधिकारी 

सर्वेक्षणाला प्राधान्य देणार

महापालिका आरोग्य विभागही करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रबोधन आणि सर्वेक्षणाला प्राधान्य देणार आहे. लवकरच महापालिका यासाठी यंत्रणा कार्यान्वयित करीत आहे. सर्व ती दक्षता घेण्यात येईल.
- डॉ. संजय कवठेकर, महापालिका आरोग्य विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT