sangli zp.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

इशारा...या गावच्या घोटाळ्याविरूद्ध रस्त्यावर उतरू

सकाळवृत्तसेवा

सांगली-मिरज तालुक्‍यातील एरंडोली आणि नरवाडच्या नळपाणी योजनांच्या घोटाळ्याची सोखल आणि पारदर्शी चौकशी करून दोषींवर फौजदारी झाली पाहिजे. त्यात हयगय झाली आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण राजमाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 


ते म्हणाले,""एरंडोली येथे सन 2009 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. नरवाडमध्ये भारत निर्माण योजनेतून काम मंजूर झाले. काही कोट रुपयांची ही कामे आहेत. गावाला दहा वर्षांत पाणी मिळाले का? योजना पूर्ण व्हायला इतकी वर्षे लागतात का? कुठे आहे पाईपलाईन, कुठे आहे पाणी? लोकांची शुद्ध फसवणूक आणि शासनाच्या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार घडलेत. तसे नसेल तर आधी ठेकेदारांची चौकशी करा. मिरज पंचायत समितीतही तसा ठराव झाला आहे. त्याची चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी करणारा ठराव झाला. एकदा दूध का दूध होऊ द्या. गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करून ही गावे पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षङयंत्र हाणून पाडू.'' 


ते म्हणाले,""जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा विषय झाला. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी दाखल करा, असे आदेश दिलेत. त्यांचा आदेश रेकॉर्डवर आला आहे, की नाही, याबाबत माहिती घेतोय. तो विषय रेकॉर्डवर आणला गेला नसेल, तर तसे करणाऱ्यांना त्याचा जाब विचारला जाईल. कुणी कुणाला पाठीशी घालत असेल तर हयगय करणार नाही, भले ते कुणीही असो.'' 

आणखी तीन गावे 

अरुण राजमाने म्हणाले,""पिण्याच्या पाणी योजनांचा घोटाळा जिल्ह्यातील अनेक गावांत झाला आहे. त्यात सिद्धेवाडी, बामनोली आणि भोसे या तीन गावांचाही समावेश आहे. पुढील जिल्हा परिषद सभेत या तीन गावांशी संबंधित उत्तरे अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.''  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT