The water of Mahisal enters Bedag from the main canal 
पश्चिम महाराष्ट्र

म्हैसाळचे पाणी मुख्य कालव्यातून बेडगमध्ये दाखल 

निरंजन सुतार

आरग : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू आहेत. गुरुवारी सायंकाळी बेडग येथील तिसऱ्या टप्प्यातील पंप हाऊस मध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मुख्य कालव्यातून दाखल झाले. सध्या म्हैसाळ येथील टप्पा क्रमांक एक मध्ये दोन पंप सुरू आहेत. तर नरवाड येथील टप्पा क्रमांक दोन मध्ये दोन पंप सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात पाणी दाखल झाले असून पंप हाऊस समोरील कालव्यातील पाणीपातळीत वाढ झाल्यानंतरच टप्पा क्रमांक तीन मधून मोटारी सुरू करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली. 

सध्या टप्पा क्रमांक एक मधील दोन पंपाद्वारे व टप्पा क्रमांक दोन मधील दोन पंपाद्वारे अशी एकूण चार पंपाद्वारे सध्या पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे. आज सायंकाळी म्हैसाळ व नरवाड येथील पंप हाऊस मध्ये आणखी एका पंपाद्वारे पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धिम्या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू असून आरग लांडगेवाडी येथील टप्पा क्रमांक चार मध्ये रविवारी पहाटे पाणी पोहोचण्याची शक्‍यता आहे. 

सध्या शेतकऱ्यांची पाणी मागणी कमी असल्याने पोट शाखा कालव्याद्वारे पाणी अद्याप कोणत्याही क्षेत्राला देण्यात आले नसल्याचे दिसत आहे. जत तालुक्‍यात पाणी पोहोचल्या नंतरच पोट शाखा कालवे सुरू केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व योजनेची रक्कम अदा केल्यानंतरच पोट कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती सूत्रांनी दिली. 

मिरज पूर्व भागातील आरग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या गावात सध्या पाण्याची पातळी खालावली असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी मागणीनुसार स्रोतांत सोडल्या नंतरच विहिरींना पाझर फुटणार आहे. त्यामुळे मुख्य कालव्यातून वाहून जाणारे पाणी जत तालुक्‍यात जाईपर्यंत शाखा कालवे सुरू होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात आंदोलन करताना धर्मेंद्र प्रधानांना झाली होती मारहाण, १९९७ चा किस्सा पुन्हा चर्चेत!

Sikkim Tunnel Collapse : सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; पोलिस अधिक्षकांनी दिली माहिती

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार सुरूच, लोकल सेवेवर परिणाम; पालघरमध्ये पूरस्थिती, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

घरातील हिरवाई : स्फूर्तीचा झरा

SCROLL FOR NEXT