water
water 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा मार्ग मोकळा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या उजनी ते सोलापूरदरम्यानच्या समांतर जलवाहिनीचा अभिप्राय जीवन प्राधिकरण कार्यालयाने शुक्रवारी सायंकाळी महापालिकेस सादर केला. त्यामुळे सुमारे 450 कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरच निघणार आहे. 

उजनी ते सोलापूरदरम्यान दुहेरी जलवाहिनी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीऐवजी महापालिकेनेच राबवावी, असा ठराव 31 जुलैच्या सभेत दुरुस्तीसह एकमताने करण्यात आला. त्याचवेळी या संदर्भातील सर्व पत्रव्यवहार करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय झाला. सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरण ते सोलापूरदरम्यान 110 दशलक्ष लिटर क्षमतेची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी 449.64 कोटी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहेत. ते काम स्मार्ट सिटी कंपनीकडून करून घेण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 449.64 कोटींचे काम केले जाणार आहे. त्यासाठी एनटीपीसीकडून 250 कोटी रुपये आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून 200 कोटी असे एकूण 450 कोटी रुपयांतून ही कामे केली जाणार आहेत, असा प्रशासकीय प्रस्ताव होता. त्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार जलवाहिनी टाकण्यासंदर्भातील अभिप्राय देण्यासाठी जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दोन महिन्यांनंतर प्राधिकरणाने अभिप्राय दिला आहे. 

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात उजनी धरणात जॅकवेल बांधणे, पंपिंग मशिनरी बसविणे, उजनी ते पाकणी ते सोरेगावपर्यंत जलवाहिनी टाकणे, महामार्ग व रेल्वे क्रॉसिंगची कामे पूर्ण करणे आणि "एनटीपीसी'बाधित तीन गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविणे ही कामे केली जाणार आहेत. अभिप्रायसंदर्भात शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांसमवेत अधिकाऱ्यांची बैठक होऊन आढावा घेण्यात आला. 

"औज'मध्ये रविवारी रात्री पाणी पोचणार 
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गोविंदपूरला पोचले होते. रविवारी रात्री उशिरा हे पाणी औजला पोचण्याची शक्‍यता आहे. औज आणि चिंचपूर बंधारा भरून घेतल्यानंतर शहराला सोमवार किंवा मंगळवारपासून नियमित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT