बेळगाव शहरात पाणीटंचाई गंभीर
बेळगाव शहरात पाणीटंचाई गंभीर sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शहरात पाणीटंचाई गंभीर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: आमदार अनिल बेनके यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही शहरातील पाणीटंचाई आटोक्यात आलेली नाही. विशेष म्हणजे चोवीस तास पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे. तिथे आता टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासाठी पाण्याचे दहा टॅंकर तैनात केल्याची माहिती पायाभूत सुविधा मंडळाकडून देण्यात आली.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधा मंडळ, तसेच एल ॲन्ड टी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, स्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वादळी पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत होतो. शिवाय अन्य कारणांमुळेही वीजपुरवठा ठप्प होतो. त्यातच जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रमाणही गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे, शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात पायाभूत सुविधा मंडळ व ‘एल ॲन्ड टी’ला अपयश आले आहे.

सध्या शहरातील दहा प्रभागांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा होतो. शहरातील अन्य प्रभागांमध्ये पाणीटंचाई असली, तरी या दहा प्रभागांत चोवीस तास पाणी दिले जाते. त्यामधील सदाशिवनगर, हनुमानगरमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. या भागात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नसल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हिंडलगा उपसा केंद्रातील विद्युतपंप जळाल्यामुळे ही स्थिती गंभीर झाली आहे. तेथे सध्या ६०० व ४०० अश्‍वशक्ती क्षमता असलेले विद्युतपंप जोडून पाण्याचा उपसा केला जात आहे. पण, आणखी ६०० अश्‍वशक्ती क्षमता असलेल्या विद्युतपंपाची गरज आहे.

जळालेल्या पंपांची दुरुस्ती सुरू असून तो बसविल्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मंडळाचे म्हणणे आहे. उपसा केंद्राच्या परिसरात अखंडीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी मंडळाचे व कंपनीचे अधिकारी हेस्कॉमच्या संपर्कात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT