Weaving illegal trades in every village in Jat East 
पश्चिम महाराष्ट्र

जत पूर्वभागातील प्रत्येक गावात अवैध धंद्यांना ऊत

दत्तात्रय सावंत

संख : उमदी पोलीस ठाण्याच्या आशिर्वादाने परिसरात जत पूर्वभागातील प्रत्येक गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अवैध दारू, मटका, सिंदी, जुगार यासारखे अवैध धंदे खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरु असून याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखानी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरीकातून होत आहे. 

उमदी परिसरातील अनेक गावे सांगली पासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते.त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे. मात्र पोलिसांनी या बेकायदा व्यवसायांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. 

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात मटका जोमात सूरु आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या मटक्‍यातून होत आहे. प्रत्येक पोलीस बिटमधील एक - दोन पोलीस कर्मचारी या मटक्‍यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहेत. या मटक्‍या बुकी कडून महीन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असलेने कारवाई करण्यास उमदी पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे. 

आघाडी शासनाच्या काळात उमदी परिसरात मटका सुरु झाला की लगेच कारवाई व्हायची आता मात्र; उमदी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सर्वच पोलीस कर्मचारी मूग गिळून गप्प आहेत.याकडे पोलीस प्रमुख गेडाम साहेबांनी वेळीच लक्ष देवून या लाचखोर पोलिसांचा भांडाफोड करावी अशी मागणी परिसरातून होत आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

SCROLL FOR NEXT