web camera set for election of belgaum the decision of election committee
web camera set for election of belgaum the decision of election committee 
पश्चिम महाराष्ट्र

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्ये वेब कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदानकेंद्रांमध्ये व बाहेर वेब कॅमेरे बसविण्यात येत आहेत. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात हे काम निवडणूक विभागाने हाती घेतले असून, त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. बेळगाव शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी हे वेब कॅमेरे बसविण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे.

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी के. एच. जगदीश व बेळगाव दक्षिणचे सहायक निवडणूक अधिकारी चनबसाप्पा कोडली यांनी गेल्या आठवड्यात या केंद्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार बेळगाव उत्तरमध्ये २०, तर दक्षिण मतदारसंघात १२ अतिसंवेदनशील मतदानकेंद्र आहेत. याशिवाय बेळगाव उत्तरमध्ये १०५, तर दक्षिणमध्ये तब्बल २६८ संवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. या सर्वच ठिकाणी वेब कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय तेथे निमलष्करी दलाचे जवानही तैनात केले जाणार आहेत.

बेळगाव शहरात याआधी झालेल्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्यावेळी ज्या मतदानकेंद्रांवर गोंधळ किंवा दंगा झाला आहे. ज्या ठिकाणी बोगस मतदानाचा प्रकार झाला आहे, अशा मतदानकेंद्रांचा समावेश संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे अशा मतदानकेंद्रांवर नजर ठेवण्यासाठी वेब कॅमेरे बसविण्यात येत आहेत. यामुळे निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून अशा मतदानकेंद्रांवर नजर ठेवता येणार आहे. यासह बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदानकेंद्र आहेत. त्या सर्वच ठिकाणी वेब कॅमेरे बसविले जाणार आहेत. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT