The wedding ceremony of two orphans in belgum 
पश्चिम महाराष्ट्र

अन् या दोघा अनाथांची अशी बांधली रेशीमगाठ...

सकाळ वृत्तसेवा

जुने बेळगाव - अनाथाश्रमातच शिकून खासगी नोकरी करणाऱ्या दोघा युवकांनी आपली अर्धांगिनीही अनाथ आश्रमातीलच युवतींना बनविले. नंदन मक्‍कळधाममधील दोघा अनाथ युवतींचा विवाह गुरुवारी (ता. २७) त्याच अनाथाश्रमात शिकून बाहेर पडलेल्या अनाथ युवकांशी झाला. त्यामुळे दोन अनाथांचे आता एक कुटुंब झाले असून त्यांच्या सुंदर भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचीही उपस्थिती होती. 

जडेप्पा पुजेरी याने लक्ष्मी कित्तूर हिच्याशी केला विवाह

सामुदायिक विवाह सोहळ्यांतर्गत हरिकाका कंपाऊंड येथे १२ वाजून २० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर दोन्ही अनाथांची लग्नगाठ बांधण्यात आली. खासगी कंपनीत काम करणारा तसेच नंदन मक्कळधाममधीलच नागराज जांगळी याने अर्चना गोठे हिच्याशी विवाह केला. तर त्याच अनाथाश्रमाचा तसेच सध्या खासगी संस्थेत सेवेस असणारा जडेप्पा पुजेरी याने लक्ष्मी कित्तूर हिच्याशी विवाह केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते. मान्यवर देणगीदारांच्या उपस्थितीत थाटात हा विवाह सोहळा झाला. यावेळी नंदन मक्कळधामच्या श्रीमती कस्तुरी यांनी जोडप्यांना शुभाशीर्वाद दिला. नंदन मक्कळधाम अनाथाश्रम हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अनाथाश्रम असून या ठिकाणी अनाथ मुला-मुलींना शिक्षण दिले जाते. तसेच खासगी सेवा संस्थांमध्ये नोकरीही उपलब्ध करून दिली जाते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

SCROLL FOR NEXT