पश्चिम महाराष्ट्र

हुपरीतील विहिरी झाल्या स्विमिंग टँक

बाळासाहेब कांबळे

हुपरी - मनसोक्त डुंबायचं म्हटलं तर तशी काही व्यवस्था नाही. अशा वेळी शहरालगत शेतांमधील विहिरीच त्यांच्यासाठी एकमेव उपाय; पण विहीर खासगी मालकीच्या. पिकांना नुकसान पोचते म्हणून विहीरमालक पोहण्यास परवानगीच देत नाहीत. मग त्यावर उपाय म्हणून पोहणाऱ्या या गटाने विहीर मालकांना विनवणी केली.

आम्ही पिकांना नुकसान पोचवणार नाही व विहिरीच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतो, अशी जबाबदारी घेतल्यानंतर ते पोहण्याचा आनंद लुटू लागले. यात माणसे जोडली गेली आणि ‘स्विमिंग क्‍लब’च तयार झाला. जोडीला हास्य क्‍लबही आकारास आला. पोहण्याबरोबरच हास्य योग नियमित करून ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’ साधण्याचा प्रयत्न येथील जलतरणप्रेमींकडून गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे.

बालकापासून पंच्याहत्तर वर्षांचे वृद्ध अशा सुमारे वीस जणांचा रोज सकाळी पोहण्याचा नित्यक्रमच बनला आहे. उन्हाळ्यातच नाही तर पावसाळा असो की हिवाळा त्यांचा उपक्रम कायम आहे. 

कोल्हापूर रोडवरील फिरगाण, इंगळी रोड वरील खेमलापुरे, माळी या विहिरी फेव्हरेट. फिरगाण विहीर जुन्या धाटणीची काळ्या जांभ्या दगडात कोरीव बांधकामात घडवलेली. खेमलापूरे विहीर आकाराने मोठी तर माळ्यांची विहीर अरुंद बांधीव. पावसाळ्यात फिरगाण विहीर सोईची ठरते. 

चार वर्षांपासून रोज सकाळी पोहायला जातो. उतारवयात जाणवणारी गुडघेदुखी पोहण्यामुळे बंद झाली. त्याचा आनंद आहे. स्विमिंग क्‍लबच्या माध्यमातून सदस्यांचे वाढदिवस साजरे करणे, अडचणी जाणून त्यांचे निराकरण, महिन्यातून एकदा स्नेहभोजन आदी उपक्रम राबवतो. 
- सुरेश इंग्रोळे,
ज्येष्ठ नागरिक स्विमिंग क्‍लब

पोहण्याच्या व्यायामामुळे शरीराला फायदा होतो. पंधरा मिनिटे रोज पोहण्याने अनेक आरोग्य समस्या नियंत्रणात येऊ शकतात. सकाळी हास्य योगा केल्याने मन तणावमुक्त राहण्यास मदत होते. 
- डॉ. सुकुमार गाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT