corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा पश्‍चिम भाग "हॉट स्पॉट' बनला...आतपर्यंत 18 रूग्ण आढळले 

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली)- शिराळा तालुक्‍यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून सर्वाधिक रुग्ण मणदूर येथे आहेत. आज रिळे येथे तीन (दोन पुरूष व एक महिला) आणि माळेवाडी (मुंबईवरून आलेला पुरूष) येथे एक रूग्ण आढळला. आतापर्यंत शिराळा पश्‍चिम भागात एकूण 18 रुग्ण सापडल्याने हा विभाग कोरोनाचे "हॉट स्पॉट' बनला आहे. गेली तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने या पावसामुळे घरोघरी जाऊन सर्व्हे करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम असते.याच परिसरात मणदूर येथे कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. या शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील बहुतांशी लोक हे मुंबईत आहेत.मुंबईत कोरोनचा फैलाव वाढू लागल्याने अनेकांनी गावची वाट धरली. त्या माध्यमातून तालुक्‍यता कोरोनचा संसर्ग वाढू लागला आहे. मुंबईहून निगडी येथे आलेल्या युवतीमुळे शिराळा तालुक्‍यात कोरोनचा पहिला शिरकाव झाला.  तीच्या संपर्कातील तिच्या चुलतीला लागण झाली.  त्याच गावातील मुंबईहून आलेल्या पण जांभूळवाडी येथे क्वारंटाईन झालेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली मुंबईहून आलेल्या कुटुंबामुळे रेड येथे कोरोनाची लागन झाली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या अंत्री खुर्द येथील युवकास कोरोनाची लागन झाली.

रेडच्या संपर्कातील दोघांना लागण झाली. मोहरे येथील मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाली.त्याच्या संपर्कातील भावाला लागण झाली. त्यापैकी लहान भावाचा कोरोनाने बळी घेतला तर मोठ्या भावाने कोरोनावर मात केली.त्यानंतर मुंबईहून खिरवडे येथील पती पत्नीस कोरोनाची लागण झाली. मुंबहुन आलेल्या करुंगली येथील युवकास कोरोनाची लागण झाली. मुंबईहून आलेल्या चिंचोली येथील एकास कोरोनाची लागण झाली. मणदूर येथील 81 वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांना कशामुळे लागण झाली हे अद्याप समजू शकले नाही.

मुंबईहून आलेल्या रिळे येथील एकास लागण झाली आहे. त्यानंतर मणदूर येथील त्या वृद्धाचा संपर्कातील सहा जणांना लागण झाली. निगडी येथील 2,रेड 2,करुंगली 1,मोहरे 1 या सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.तालुक्‍यात निगडी 4 , रेड 3 , अंत्री खुर्द 1 , मोहरे 2 , खिरवडे 2, करुंगली 1 , चिंचोली 1 , मणदूर 6, काळोखेवाडी 1, रिळे 4, माळेवाडी 1 असे एकूण 26 रुग्ण झाले आहेत. कोरोना बधितांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. 

  • तालुक्‍यात एकूण रुग्ण-26 
  • कोरोना मुक्त रूग्ण-6 
  • उपचारा खालील-19 
  • मृत 1 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT