पश्चिम महाराष्ट्र

कोरोनातून सावरणाऱ्या 'युके'समोर कोणती आव्हाने?...वाचा

ऋतुजा राजमाने, लिडस्‌ (इंग्लड)

आमचं मुळ गाव मिरज तालुक्‍यातील कवठेपिरान. वडीलांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही पुणेकर झालो. सिबॉयसिसमधून बीएस्सी कलीनरी आर्टस्‌ पदवीनंतर सध्या मी इंग्लडमधील लिडस्‌ बेकेट्‌ युनिव्हर्सिटीत आहारशास्त्रातील एमएस्सी स्पोर्टस ऍन्ड एक्‍सरसाईज न्युट्रीशन या पदवीसाठी इथे आले आहे. इंग्लड,स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स, या चार देशांचा समुह म्हणजे युके. क्रिकेटप्रेमींना लिडस्‌ माहित असेलच. सुमारे सव्वाआठ लाख लोकसंख्येचे हे शहर ब्रिटीशांच्या सांस्कृतिक वारशाने समृध्द असलेले. परंपराप्रिय अशा या शहरात कोरोनाच्या आपत्तीने पहिल्या टप्प्यात चांगलीच भंबेरी उडाली. अचानक टाळेबंदीने खाद्यपदार्थांपासून अनेक बाबतीत मोठी टंचाई झाली. चार दिवसाच्या धावपळीनंतर पुरवठा सुरळीत झाला. शासनाने इथे धान्य-किटस्‌चे वाटप झाले. धान्याच्या किंमतीही कमी केल्या. जीवनावश्‍यक वस्तु दुकाने पुर्णवेळ सुरु झाली आणि गोंधळ कमी होत गेला.
घरी स्वयंपाक हे ब्रिटीशांसाठी दिव्यच. माझ्यासाठी मात्र ती सवय. विद्यापीठातही रहायचीच सोय असते. त्यामुळे टाळेबंदीचा तसा मला थेट फरक पडला नाही. साधारण दीड महिन्याची टाळेबंदी 20 एप्रिलपासून शिथील झाली. जनजीवन पुर्वपदावर येतेय मात्र अनेक समस्यांसह. आता इथे वेतनात सरासरी 20 टक्के कपात झाली. सरकारने असा आदेश काढतानाच कंपन्यांसाठी खेळते भांडवलही उभे करून दिले. घरातूनच काम करण्यासाठी सर्वच पुढे आल्याने कामकाज पुर्ण ठप्प असं झालं नाही. ऐतिहासिक अशा सर्वच पर्यटन केंद्रांना फटका बसल्याने अवलंबितांना फटका बसला. ही समस्या जगभराचीच. त्यावर इथे काय उपाय होतो हे बघावे लागेल. मंदीच्या झळा तीव्र आहेत. वेतन कपात आणखी वीस टक्के वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता सरकारकडे सर्वांच्या नजरा आहेत.

इथल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचं मोठं सर्वव्यापी जाळं चारही देशांत आहे. त्याअंतर्गत राव असो वा रंक सर्वांवर उपचार होतात. कोविडने गाठलेल्या पंतप्रधान बोरीसनी याच व्यवस्थेत उपचार घेतले आणि बरे झाले. एरवीही आजाराबद्दल शंका वाटली तर सहज उपलब्ध मदत क्रमांकांवर संपर्क साधला तर फोनवरूनच प्रश्‍न विचारले जातात. आणि आवश्‍यक वाटले तर न्यायला थेट रुग्णवाहिकाच येते. रुग्ण सापडला तर त्याच्या वावरात फिरती प्रयोगशाळा दाखल होते. "ड्राईव्ह थ्रु सॅंपल' ही ती सुविधा. एकाचवेळी शेकडो थुंकी नमुने घेतले जातात. आणि 48 तासात अहवाल जाहीर होतात. आजही ही मोहिम अखंड सुरु आहे. गृह-परिसरात मर्यादित टाळेबंदीही लागू होते. त्यामुळे आता साथ आटोक्‍यात आहे. आत्तापर्यंत पुर्ण युकेमध्ये 2 लाख 69 हजार बाधित तर 37 हजारांवर मृत्यू आहेत. भिती वाटावे असेच हे प्रमाण. लिडस्‌मध्ये 1600 बाधित आहेत. त्यामुळे टाळेबंदीनंतर मलाही भारतात यावं असं वाटलं. मात्र विमाने बंद झाली. आता इथेही भिती कमी झाली आहे. तुर्त परतण्याचा विचार नाही. इथे आता कोरोनासोबतचे जगणे सुरु झाले आहे.

(शब्दांकन-ज्ञानदेव मासाळ)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT