tenant.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

भाडेकरूना शासनाकडून काय मिळाला दिलासा?..वाचा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाऊन' आणि संचारबंदीमुळे अनेक ठिकाणचे उद्योग-व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा ठप्प आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बरेच कामगार, मजूर भाड्याच्या घरात राहतात. अनेकांना भाडे भरणेही मुश्‍किल आहे. त्यामुळे घरमालकांनी अशा बिकट परिस्थितीत किमान तीन महिने भाडेवसुली पुढे ढकलावी. भाडे थकल्यामुळे घर खाली करायला लावू नये अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. 


संपूर्ण जगभरात कोरोना ने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी देशात 23 मार्चपासून "लॉकडाऊन' करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात "लॉकडाऊन' 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. "लॉकडाऊन' मुळे सर्व बाजारपेठांसह उद्योग, व्यवसाय, कारखाने, कंपन्या बंद आहेत. काहींचे "वर्क फ्रॉम होम' चालू आहे. परंतू कारखाने, बाजारपेठा, उद्योग बंदमुळे कामगार आणि मजूरांना बेरोजगार व्हावे लागले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले आहे. कोरोना साथीच्या समस्येबरोबर त्यांना कठीण अशा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 


शासनाने रेशनकार्डवर धान्य वाटप सुरू केल्यामुळे आधार मिळाला आहे. परंतू दैनंदिन खर्चासाठी आर्थिक टंचाई भेडसावत आहे. तशातच राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक अडचणीमुळे भाडेकरूंना राहत असलेल्या घराचे नियमित भाडे भरणे शक्‍य नाही. गेल्या महिन्याचे भाडे थकले आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत घर मालकाने भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी अशा सूचना दिल्या आहेत. वेळेवर भाडे दिले नाही म्हणून किंवा भाडे थकले म्हणून भाडेकरूंना घराबाहेर काढू नये अशा सूचना केल्या आहेत. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नावाने हे पत्रक प्रसिद्ध झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT