Wheat, gram, maize sowing is more in Atpadi taluka 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी तालुक्‍यात गहू, हरभरा, मका पेरणी अधिक

नागेश गायकवाड

आटपाडी : अतिवृष्टीच्या तडाख्यातून बाहेर येऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची वेगात पेरणी सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा आणि मका यांची मोठ्या क्षेत्रावर पेरणी केली आहे. तर ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. 

अतिवृष्टी आणि तुफान पाच महिन्याच्या पावसाचा जिल्ह्यात सर्वाधिक मोठा फटका आटपाडी तालुक्‍याला बसला आहे. तालुक्‍यात तब्बल विक्रमी एक हजार मिलिमीटर पाऊस कोसळला. खरिपाची पिके शेतातच कुजून गेली. अनेक शेतांत पाणी साठवून पाझर लागले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरून शेतकरी बाहेर पडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची कामे केली महिनाभर करून रब्बी पिकांची पेरणी वेगात सुरू केली आहे. रब्बीच्या ज्वारी पेरणीला यावर्षी खूपच उशिरा झाला आहे. 

आटपाडी तालुक्‍यात रब्बीचे 34 हजार हेक्‍टर क्षेत्र असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पेरणी केली जाते. मात्र पेरणीस उशीर झाल्यामुळे आणि पुरेसे पाणीही असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि माका या रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. बहुतांशी सर्व गावचे ओढे-नाले अध्यापिका संथ वाहत आहेत. यावर्षी ज्वारी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे तर गहूळ हरभरा या क्षेत्रात वाढ झाली आहे. याशिवाय इतर भाजीपाला पिकांची ही मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT