When was the beautification of Bhagirathi Temple & Pond at Jhare? 
पश्चिम महाराष्ट्र

झरे येथील भागीरथी मंदिर, कुंडाचे सुशोभीकरण कधी? 

सदाशिव पुकळे

झरे (जि. सांगली) : येथील भागीरथी मंदिर व कुंड विकास, सुशोभीकरणापासून वंचित आहे. देवीचे छोटेसे मंदिर, मंदिरापुढे कुंड आहे. परिसराची दुरुस्ती करून कुंडाला घाट बांधण्याची गरज आहे. भाविकांनासाठी रस्ता होण्याची गरज आहे. कुंडात तीन वर्षातून एकदा येथे जलस्रोत प्रवाहीत होतो. त्याचबरोबर भवानी, महादेव मंदिरातही कुंड आहेत. तिनही कुंडात एकाच वेळी पाणी येते.

याबाबतची माहिती अशी, की झरेपासून पूर्वेला दोन किलोमीटरवर भागीरथी देवीचे मंदिर आहे. तेथे मंदिरासमोर कुंड आहे. कुंड दर तीन वर्षांनी आपोआप पाण्याने भरतो. संक्रातीला महिला भगीरथी उगम पावली म्हणून पूजेसाठी येतात. त्यावेळी यात्रेचे स्वरूप येते. 


त्यापूर्वी काही दिवस नागरिक कुंड, मंदिराची सफाई करतात. भागीरथी उगम पावल्यानंतर पोलिस पाटील खणानारळाने ओटी भरतात. महिलांची पूजा व ओटी भरण्यासाठी गर्दी असते. तीन वर्षातून एकदा संक्रातीअगोदर भागीरथी उगम पावते. परिसर सुशोभीकरण, विकासापासून दुर्लक्षित आहे. 

पायऱ्या, घाट हवा 

भागीरथी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता व्हावा. मंदिराची दुरुस्ती व्हावी. कुंडाला पुष्कर्णीसारख्या पायऱ्या वा घाट पद्धतीने बांधकाम करून त्यांचे सुशोभिकरण होण्याची गरज आहे.

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT