uday.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे कुठेही असतील, त्यांचे स्वागत करतो : छत्रपती संभाजीराजे

अशोक मुरुमकर

सोलापूर : उदयनराजे कुठेही असतील त्यांचे स्वागत करतो, असे प्रतिपादन राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

सोलापूरात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी रविवारी (ता. ८) 'सकाळ'शी संवाद साधला. विधानसभेच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांची जोरदार पक्षांतरे सुरु आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक वरीष्ठांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून कहीजण प्रवेशाच्या वाटेवर आहेत. खासदार उदयनराजेही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा आहे.

याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विचारले असता, ते म्हणाले उयनराजे हे आमचे बंधू आहेत. ते कोठेही असले तरी त्यांचे स्वागत करतो. सध्याच्या पक्षांतराबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकीय काही बोलायचे नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने काढलेल्या 'शिवस्वराज्य' यात्रेत उदयनराजे दिसले नाहीत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षांतराबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही त्यांची भेट घेतली होती. उदयनराजे यांच्या राजकीय भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गड किल्ले भाड्याने देण्याबाबत आपला विरोध असल्याचे सांगत माझी भुमिका मी पेजवर स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT