Who is to say, the pathari dispute is settled 
पश्चिम महाराष्ट्र

कोण म्हणतंय, पाथरीचा वाद मिटला

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून शिर्डीत निर्माण झालेला वाद आज शमला. मात्र, पाथरी हीच साईंची जन्मभूमी आहे ही पाथरीकरांची भूमिका मात्र बदललेली नाही. त्यांचा हा दावा चाळीस वर्षांपासूनचा. साईजन्मभूमी असे नामकरण करून त्यांनी तेथे वीस वर्षांपूर्वी साईमंदिर उभारले. पाथरी, सेलू ते धुपखेडा आणि त्यानंतर शिर्डी असा साईंचा प्रवास झाला. आता पाथरी बरोबरच सेलू आणि धुपखेडा या दोन्ही ठिकाणांचा देखील विकास व्हावा, अशी अपेक्षा तेथील लोकप्रतिनिधींनी व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे आज हा वाद केवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानापुरताच मिटला. त्याचे कवित्व अद्यापि संपलेले नाही. 

भूमिका बदलेली नाही 
आजच्या वादावर पडदा पडल्यानंतर पाथरी विकास कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मात्र आपली भुमिका बदललेली नाही. ते म्हणाले, पाथरी हीच साई जन्मभूमी आहे. बाबांचा प्रवास पाथरी, सेलू, धुपखेडा व त्यानंतर शिर्डी असा झाला. सरकारने आम्हाला विकास निधी देवो अथवा न देवो आमच्या दाव्यावर आम्ही ठाम आहोत. पाथरी बरोबरच सेलू व धुपखेड्याच्या विकासाची मागणी तेथील ग्रामस्थ करीत असतील तर ती बरोबर आहे. 

विरोध कायम 
पाथरी व त्या परिसरातील ग्रामस्थांची भूमिका पूर्वी होती तशीच कायम आहे. काही शिर्डीकरांच्या मते साई जन्मभूमी असल्याचे आणखी आठ ठिकाणी दावे केले जातात. हे खरे असेल तर आणखी वाद आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातून कायम स्वरूपी मार्ग काढायचा असेल तर साईसंस्थानला पुरावे व तर्कावर आधारित भूमिका घ्यावी लागेल, असे जाणकारांचे मत आहे. 

दहा गावे म्हणातात, हीच जन्मभूमी 
कमलाकर कोते (शिवसेना नेते, शिर्डी ) ः केवळ आठ नव्हे तर दहा ठिकाणचे ग्रामस्थ आमचे गाव ही साईंची जन्मभूमी आहे, असा दावा करू लागले आहेत. त्यात आणखी भर पडणार आहेत. मात्र, ग्रामस्थ या नात्याने आम्ही सबका मालिक एक ही बाबांची शिकवणूक पुढे चालवू. साईसंस्थानने या बाबत संशोधन विभाग सुरू करावा. तर्कशुद्ध मांडणी व पुराव्याचे आधारे असे दावे करणाऱ्यांना रोखायला हवे. आपण ही मागणी संबंधितांकडे गांभीर्याने करणार आहोत. 

पाथरीचे नाव जगात गेले 
आमदार बाबाजानी दुर्राणी (अध्यक्ष, पाथरी विकास कृती समिती) ः सरकारने निधी दिला नाही तरीही गेल्या चाळीस वर्षापासून साई जन्मभूमी म्हणून पाथरीचा विकास सुरू आहे. चाळीस वर्षात शक्‍य झाली नाही. एवढी प्रसिद्धी पाथरीला गेल्या दोन दिवसांत मिळाली. पाथरीचे नाव जगात जाऊन पोचले. याचे मला समाधान वाटते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT