kolhapur guardian minister politics News 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार ?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील तीन आमदारांना संधी मिळाली. कॅबिनेट मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, तर राज्यमंत्री म्हणून काँग्रेसचे सतेज पाटील व शिवसेनेचे सहयोगी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची वर्णी लागली आहे. आता या मंत्र्यांना मिळणारी खाती आणि त्यापेक्षाही अधिक लक्ष लागले आहे, ते जिल्ह्याचा पालकमंत्री होणार कोण, याकडे पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यात रस्सीखेच असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री होण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मध्यंतरी कलगीतुराही झाला होता. आता प्रत्यक्ष पालकमंत्री निवडीवेळी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच

पालकमंत्र्यांची निवड ही मुख्यमंत्र्यांकडून होत असली तरी संबंधित जिल्ह्यातील राजकीय चित्र डोळ्यांसमोर ठेवून ती करण्यात येते. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री कार्यरत असल्याने जिल्ह्याच्या विकासावर त्यांची मोहर असते. कोणाला झुकते माप द्यायचे आणि कोणाचा कार्यक्रम करायचा, याची खेळीही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून खेळली जाते. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी, विरोधकांना खिंडीत पकडण्यासाठी आणि पक्षाचा आणि गटाचा विस्तार करण्यासाठी पालकमंत्री पद कामी येते. त्यामुळे पालकमंत्री होण्यासाठी नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. आजही अशीच परिस्थिती आहे.

मंत्रिमंडळात येण्याची खात्री असल्यानेच आठवड्याभरापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री हे काँग्रेसलाच मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला होता. जिल्ह्यात १० पैकी काँग्रेसचे चार आमदार आहेत, विधान परिषदेचा एक आमदार आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या पक्षाला मंत्रिपद, असे समीकरण आहे. त्यामुळेच आमदार पाटील यांनी हा विश्‍वास व्यक्‍त केला होता; मात्र त्यांच्या वक्‍तव्याचे उलट पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रक प्रसिद्ध करुन आमदार पाटील यांच्या वक्‍तव्याला आव्हान दिले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ असल्याने त्यांचीच पालकमंत्री पदासाठी दावेदारी असल्याचे राष्ट्रवादीकडून आजही सांगण्यात येत आहे. आमदार सतेज पाटील यांना राज्यमंत्रिपद दिल्याने कॅबिनेट मंत्री म्हणून मुश्रीफ यांनाच पालकमंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहे.

प्रतिष्ठेचा विषय

राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसही पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. कारण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थातच उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार, तर सांगलीचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, तर साताऱ्याचे पालकमंत्रिपद बाळासाहेब पाटील यांना मिळणार, असे संकेत आहेत. या तिनही जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार जादा असल्याने सतेज पाटील यांनाच संधी मिळेल, असा कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे. कोल्हापुरात डावलले तर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसला कोठेही संधी मिळणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हा प्रतिष्ठेचा विषय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

Pesarattu Recipe: प्रोटीनने भरपूर, चवीला जबरदस्त! आंध्र प्रदेशचा लोकप्रिय नाश्ता पेसरट्टू; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा ट्राय कराल

SCROLL FOR NEXT