The wife doesn't know that we are unpaid ... 
पश्चिम महाराष्ट्र

बायकोला माहीत नाही की आम्ही बिन पगारी आहोत...

दिलीप क्षीरसागर

कामेरी : अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात गेली पंधरा वर्षे काम करूनही पगार नाही. मात्र बायकोला ही माहीत नाही की आम्ही बिन पगारी आहोत. पण आता सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना आमची आम्हालाच लाज वाटते अशी प्रतिक्रिया कनिष्ठ महाविद्यालयात वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांनी दिली. 

राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात वाढीव व पायाभूत पदावर 1295 शिक्षक व शिक्षिका काम करीत आहेत. ही पदे 2002 ते आज अखेरची आहेत. यावर अनेक वेळा संघटनेने आवाज उठवला. महिन्यापूर्वी या पद मंजुरीच्या फाईलवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वाक्षरी केली आहे. ती आता कॅबिनेट पुढे मंजूर कधी होते याची प्रतीक्षा या कर्मचाऱ्यांना लागली आहे. यातील बरेच कर्मचारी पंधरा ते अठरा वर्षे विनावेतन काम करत आहेत. मात्र आपणास वेतन मिळत नाही ही बाब त्यांनी कोणाला सांगितली नाही. 

काही कर्मचाऱ्यांनी तर आपल्या कुटुंबातील अर्धांगीला ही याचा पत्ता लागून दिलेला नाही. असे किती दिवस अजून गप्प बसायचे असाही प्रश्न या कर्मचाऱ्यांमुळे उभा राहिला आहे. काही कर्मचारी तर यातील सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. जर या पदांना वैयक्तिक मान्यता मिळाली नाही. तर यातील काही सेवक पगाराविना निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता शासनाने अंत पाहू नये, अशी मागणी संघटनेने केलेली आहे. 

राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या सेवकाच्या अनुदान मागणी व पद मंजुरीसाठी गेली पंधरा ते अठरा वर्षे झगडत आहे. आम्ही आमच्या बायकोला देखील पगार नाही म्हणून सांगू शकत नाही. आमच्यातील काही कर्मचारी हे सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. आता तरी तातडीने ही पदे मंजूर देऊन पगार सुरू करावा. 
- सचिन चव्हाण, अध्यक्ष राज्य कृती समिती वाढीव पद संघटना.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT