Wildlife Indian Porcupine esakal
पश्चिम महाराष्ट्र

चांदोली उद्यानात आढळले दोन साळिंदर; काय आहे प्राण्याची खासियत? जीवाला धोका असल्यास कसा करतो शिकाऱ्यावर आक्रमण?

चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन साळिंदर (Wildlife Indian Porcupine) आढळलेत.

शिवाजीराव चौगुले

साळिंदर या प्राण्याविषयी सामान्य समज असा आहे की, तो आपल्या शरीरावरील काटे फेकून मारतो! मात्र तसे अजिबात नसते.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात (Chandoli National Park) २३ मे रोजी झालेल्या प्राणी गणनेत दोन साळिंदर (Wildlife Indian Porcupine) आढळले आहेत. मिरजेजवळील दंडोबा डोंगर (Dandoba Dongar) रांगांतही या प्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. जिल्ह्यात नदीकाठी शेतशिवारातही साळिंदर दिसून येते. त्याचा अधिवास असा विविध भागांत आढळतो. जंगल, शेती, शहरी भागाजवळ बागांत जमिनीत बीळ करून राहणाऱ्या साळिंदराबद्दल नेहमीच सर्वसामान्यांना उत्सुकता राहिली आहे. त्याच्याविषयी...

साळिंदर या प्राण्याविषयी सामान्य समज असा आहे की, तो आपल्या शरीरावरील काटे फेकून मारतो! मात्र तसे अजिबात नसते. या प्राण्याच्या पाठीवर जे केस असताना ते मानेकडे काळ्या रंगाचे असतात, तर पाठीवर आणि शेपटीजवळ काळ्या-पांढऱ्या रंगाचे असतात. साळिंदराची खासियत म्हणजे त्याचे केस एकत्र जुळतात आणि त्यापासून आतून पोकळ असणारे काटे तयार झालेले आहेत. हे काटे त्याच्या त्वचेत अतिशय सैलशीर असतात. त्या काट्यांची लांबी १२ ते ५१ सेंटिमीटर लांब असू शकते. पाठीच्या खालील बाजूस शेपटीजवळ असलेले काटे कठीण असतात, ज्यांचा वापर संरक्षणासाठी होतो.

हल्ला परतवणारा

एखाद्या प्राण्याने शिकारीसाठी हल्ला केला, तर साळिंदर शेपटीजवळचा भाग हलवून तेथील काट्यांचा सळसळ आवाज काढते. हा त्या शिकारी प्राण्याला ‘वॉर्निंग कॉल’ असतो. त्यानंतरही शिकारी मागे हटला नाही,

तर साळिंदर वेगाने उलट दिशेने त्या प्राण्याच्या अंगावर धावत जाऊन धडक देताना आदळते. कठीण काटे त्या प्राण्याच्या अंगात घुसतात. साळिंदर असाच स्वतःचा बचाव करते. हे निघालेले काटे काही दिवसांनी पुन्हा उगवतात.

प्रजनन

हा प्राणी वर्षभर प्रजनन करतो. एकावेळी एक ते दोन पिलांना जन्म देतो. नर-मादी मिळून त्या पिलांचे संगोपन करतात. ते समूहाने राहतात आणि निशाचर आहेत.

उंदीर कुळातील

नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे अमोल जाधव सांगतात, ‘‘साळिंदर हा उंदराच्या कृदंत कुळातील असल्याने त्याचे समोरील चार दात लांब व धारदार असतात. एकमेकांवर घासून ते धारदार झालेले असतात. ते उंदरासारखे सतत कुरतडत राहतात. पूर्ण वाढलेल्या साळिंदराची लांबी ७० ते ९० सेंटिमीटर असते. शेपूट ८ ते १० सेंटिमीटर असते. साळिंदर कधीही काटे फेकून मारत नाही. ते झाडांच्या मुळ्या, कंद, धान्य, कीटक, सरपटणारे प्राणी आदी खाऊन जगते.’’

शेड्युल वनमध्ये स्थान

भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार साळिंदरला अनुसूची एक मध्ये स्थान दिले आहे. त्याची शिकार केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याच्याकडून पिकाचे नुकसान झाल्यास तर पिकाची भरपाई देण्याची कोणतीही तरतूद नाही, असे नाही मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT