ration shop.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

रेशन दुकानांची यामुळे होणार अचानक तपासणी

सकाळवृत्तसेवा

सांगली- सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढीला आळा घालण्यासाठी वैधमापन, पुरवठा व सर्व तहसिलदारांच्या नियंत्रणाखाली पथकांकडून जिल्हाभरात तपासणी केली जात आहे. यामध्ये रेशन दुकानांना अचानक भेटीही दिल्या जात आहेत. सर्वच ठिकाणी सुरक्षित अंतर पाळले जाते का याचाही आढावा घेतला जातो आहे. 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आदेशानुसार जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी व चढ्या दराने वस्तूंची विक्री करणाऱ्यावर मंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढवल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात येत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता सरकारी यंत्रणा खबरदारी घेत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरीही काही दुकानदार, भाजी विक्रेत्याकडून त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे. 

साठेबाज व भाववाढ नियंत्रित करणारी पथकांकडून किरकोळ तसेच घाऊक व्यापारी, गोदामे, शीतगृहे आदी ठिकाणी असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई बाबत निर्णय घेतात. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैधमापन शास्त्र विभाग व पोलिस यांना संयुक्त कारवाई करण्यात येते. 

पुरवठा विभागाला सहकार्य करा... 
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय योजना तसेच प्राधान्य लाभार्थी कुटुंब धारकांना नियमित धान्यासोबतच मोफत तांदळाचे वितरण पूर्ण होत आहे. केशरी रेशनकार्ड असलेल्या व यापूर्वी कोणतेही लाभ न घेणाऱ्या कुटुंबांना मे आणि जून महिन्यामध्ये जिल्ह्यातील 10.18 लाख लोकांना गहू व तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. या कामामध्ये पुरवठा विभागाची यंत्रणा व्यस्त आहे. अशा वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवठा केला जाणाऱ्या अन्न-धान्याच्या कामामध्ये सहाय्य करण्याचे आदेश काढले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT