This will make the descendants of Ahliabai Holkar 
पश्चिम महाराष्ट्र

अहल्याबाईं होळकरांचे इंदोरचे वंशज करणार हे काम

सकाळ वृत्तसेवा

नगर ः अहल्याबाई होळकर यांनी मराठेशाहीची पताका उत्तर भारतात फडकत ठेवली. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकदम कुशल पद्धतीने राज्यकारभार केला. त्यांनी केलेले जलव्यवस्थापन आजही अभ्यासण्यासारखे आहे. दरोडेखोरांचा केलेला बीमोड असो नाही तर मैदानात दाखवलेला पराक्रम असो, अशा सर्वच बाबतीत त्यांची सरस कामगिरी होती. नद्यांवर बांधलेले घाट, बारवा आजही प्रेक्षणीय आहेत. मात्र, त्याचे पुनर्जीवन झाल्यास लोकांना त्याचा फायदा होईल.

""दुष्काळातून शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अहल्याबाई होळकरांनी बांधलेल्या सर्व बारवांचे पुनर्जीवन करण्याची मोहीम आगामी काळात हाती घेणार आहे,'' असे प्रतिपादन पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकरांचे इंदोर संस्थानचे वारस भूषणसिंह राजे होळकर यांनी केले. 
पुण्यश्‍लोक संस्कार प्रतिष्ठानतर्फे नगरमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख होते. लक्ष्मी धनगर, दादाभाऊ चितळकर, अण्णासाहेब बाचकर, अशोक कोळेकर, सुवर्णा पाचपुते, शरद बाचकर आदी उपस्थित होते.

 
होळकर म्हणाले, ""अहल्याबाईंनी इंदोर संस्थानच्या गादीवर असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. पिण्याच्या पाण्यासाठी बहुतांश ठिकाणी बारव व विहिरी बांधल्या. नगर जिल्ह्यातील बारव व अन्नछत्र यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी होळकर संस्थान व राज्य सरकारकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.''

प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट महारनवर यांनी केले. अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बाबासाहेब नऱ्हे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली पिसाळ यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT