10th
10th 
पश्चिम महाराष्ट्र

दहावीतील टक्केवारीचा फुगा पुढील शैक्षणिक वर्षात फुटणार? 

सिद्धार्थ लाटकर

सातारा - इयत्ता दहावीचा निकाल आज (शुक्रवार) लागला. राज्यातील सर्व जिल्ह्यांत निकालाची टक्केवारी उत्तम असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अभ्यासक्रमातील बदल, तोंडी परीक्षा न घेण्याचा झालेला निर्णय यामुळे आगामी शैक्षणिक 2018-19 वर्षापासून शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील एका शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यापैकी 99 टक्के विद्यार्थ्यांना 50 पेक्षा जादा टक्के मिळाले आहेत. केवळ एकच विद्यार्थी 36 टक्‍क्‍यांवर उत्तीर्ण झाला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांत तोंडी (20 गुणांची) परीक्षा ऐवजी 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परिणामी तोंडी परीक्षेचे सध्या मिळणाऱ्या गुणांमध्ये फरक पडेल असे ही म्हटले जात आहे. यामुळे वैयक्तिक टक्केवारीचा फुगा फुटेल; परंतु, उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्येवर फारसा परिणाम होणार नाही, असे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. 

दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा 93.43 टक्के निकाल लागला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 95.35 टक्के, तर सांगली जिल्ह्याचा निकाल 92.25 टक्के इतका लागला आहे. इयत्ता दहावीचा निकाल आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सायबर कॅफेत गर्दी झाली होती. अनेक जण निकालाची प्रिंट काढून घेत होते. विद्यार्थी ही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते. शहरातील मिठाई विक्रेत्यांच्या दुकानात पेढे घेण्यासाठी ही गर्दी होती. दरम्यान दहावीच्या परीक्षेसाठी यंदा सातारा जिल्ह्यात 43 हजार 071 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 12 हजार 534 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 14 हजार 238 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 10 हजार 801 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तसेच दोन हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालात जिल्ह्यात यंदा मुलींनीच बाजी मारली असून, 95.36% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 91.81 इतकी आहे. 

तालुकानिहाय निकाल 
जावळी - 95.57, कऱ्हाड 93.14, खंडाळा - 94.33, खटाव - 94.70, कोरेगाव - 93.59, माण - 95.48, महाबळेश्‍वर - 95.69, फलटण - 89.72, पाटण - 92.87, सातारा - 93.10, वाई - 95.18 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT