Will the teacher's team come together? The bank will challenge the committee 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक संघाचे गट एकत्र येणार? बॅंकेत समितीला आव्हान देणार

अजित झळके

सांगली ः राज्यातील 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी बॅंकेतील विरोधी शिक्षक संघाचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी धडपड करत आहेत. संघाचा शि. द. पाटील गट आणि थोरात गट एकत्र येऊन सत्ताधारी शिक्षक समितीला आव्हान देणार आहेत. 

शिक्षक बॅंकेची निवडणूक जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिक्षक समितीला हा अधिकचा कालावधी मिळाला आहे. सहाजिकच, या काळात बरीच उलथापालथ झाली आहे. समितीला मतदार बांधण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्याचवेळी शिक्षक संघालाही परिस्थितीचा फायदा घेत एकमेकांशी जुळवून घेण्याची संधी मिळाली आहे. तिरंगी लढत झाली तर हाती काहीच लागत नाही, याची जाणीव संघाला गेल्या निवडणुकीतच झाली होती. त्यामुळे यावेळी शि. द. पाटील गट दोन पावले मागे जावून तडजोडीच्या भूमिकेत येऊ लागला आहे.

त्याआधी या गटातच दुफळी माजली होती. शि. द. पाटील यांचे चिरंजीव माधवराव पाटील आणि नातू शंभोराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे "जुळता-जुळता राहिलयं' अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आता सुधारणा करण्यात येत आहे. त्यानंतर समितीशी लढण्यासाठी जे काही करायला लागेल ते करू, असा निर्धार राज्याच्या नेत्यांनी केला आहे. थोरात गट त्याला कसा प्रतिसाद देतोय, याकडे लक्ष असणार आहे. 

शिक्षक बॅंकेत पुढेही सत्ता कायम राखण्यासाठी समितीकडून पूर्ण ताकद लावण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात वाढवलेले सभासद त्यांच्या पथ्यावर पडतील, असा त्यांना विश्‍वास आहे. गेल्या पाच वर्षांतील कारभाराबाबत विरोधकांनी टीका केलीय आणि सत्ताधाऱ्यांनी बचावही केला आहे. ते मुद्दे चर्चेत राहणारच आहेत, मात्र बेरजेच्या राजकारणावर

संपादन :  युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT