Sangli  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Agriculture News : अधिक उष्मांकामुळे थंडीच्या दिवसांत बाजरीला महत्त्व

Bajri Crop : हिवाळ्याला प्रारंभ झाला असून शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. केवळ स्वेटर घालून थंडी थांबत नाही. यासाठी तीळ, बाजरी, हुलग्याचे सेवन केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : हिवाळ्याला प्रारंभ झाला आहे. या काळात शरीरात उष्णतेची आवश्यकता भासते. केवळ स्वेटर घालून थंडी थांबत नाही, तर या काळात शरीराला आतून आवश्यक ते घटक देण्याची तितकीच गरज असते. अशा वेळी तीळ, बाजरी, हुलग्याचे सेवन केले जाते. यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाजरीची भाकरी.

अन्न आहारातील महत्त्वाचा भाग म्हणजे पिष्टमय घटक. यास शुष्क धान्य अथवा तृणधान्य असे संबोधले जाते. कामामुळे किंवा आजारीपणामुळे झालेली झीज भरून काढण्यासाठी पिष्टमय घटक अतिशय उपयुक्त असतात.

वार्षिक एकदल वनस्पती असलेली बाजरी ही खरीप हंगामात येते. यात पिष्टमय प्रथिने, लोह, कॅल्शियम, स्निग्ध, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘ब’ उपलब्ध असतात. विशेषतः पिष्टमय, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ‘अ’ जास्त प्रमाणात असल्याने भरपूर कॅलरीज मिळतात.

यामुळे बाजरी धान्य जास्त उष्मांक धारण करते. बाजरी हे धान्य शरीरास जास्त पौष्टिक आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आदी डोंगरी भागात खरीप पीक म्हणून बाजरीची लागवड केली जाते.

सर्वसामान्य लोकांच्या आहारातील मुख्य धान्य बाजरीची परवडणाऱ्या दरात विक्री होते. बाजरीपासून भाकरी, खिचडी, थालीपीठ, उंडे, खारेवडे, धपाटे केले जातात. मकर संक्रांतीदिवशी बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून खातात. शरीरात भरपूर ऊर्जा निर्माण करते व रोगप्रतिकारकशक्ती तयार करते. थंडीमध्ये अधिक उपयोगी असणारे हे धान्य आहे. बाजरीचा शरीरातील साखर आणि अर्धांगवायूमध्ये उपयोग होतो. महिलांच्या शारीरिक बदलाच्या कालावधीमध्ये शरीराची होणारी झीज भरून काढली जाते.

रक्तातील लोहाचे प्रमाण चांगले ठेवते, फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते, दमा, सर्दी, खोकला असणाऱ्यांनी बाजरी खावी. वजन कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. बाजरी ही मूळव्याध असणाऱ्यांनी, गर्भवती महिला, हायपो थायरॉईडझमच्या व्यक्तींनी कमी प्रमाणात खावी.

- डॉ. अर्चना ऐनापुरे, निसर्ग उपचार तज्ज्ञ

#ElectionWithSaka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT