Sangli Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Winter : थंडीची चाहूल; स्वेटर, कानटोप्यांना मागणी

Winter : हिवाळ्यात गुलाबी थंडीची चाहूल लागताच स्वेटर, कानटोप्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वाढती मागणी आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : हिवाळ्यात गुलाबी थंडीची चाहूल लागताच स्वेटर, कानटोप्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वाढती मागणी आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार स्वेटर खरेदी करताना दिसतो. जुन्या पद्धतीच्या तुलनेत नव्याने बाजारपेठेत अवतरलेल्या पॅटर्नसाठी वाढती मागणी आहे.

दीपावलीदरम्यान सुरू होणाऱ्या हिवाळ्यात गुलाबी थंडीची प्रतिवर्षी चाहूल लागते. यावेळी गारठ्यापासून शरीराचे संरक्षण करण्याकरिता स्वेटर, कानटोप्या व मफलर अशा ऊबदार कपड्यांचा आधार घेतो. त्याच्याच खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे.

जुन्या पद्धतीच्या स्वेटरच्या तुलनेत ग्राहकांनी फेदर वूलन, लोकर व जर्किन अशाप्रकारच्या फॅन्सी स्वेटरला पसंती दिली आहे. परराज्यांतून त्यासाठीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून स्वेटर शर्ट या स्वेटअर प्रकाराला अधिक मागणी आहे.

लहान व तरुण मुले आणि मुलींसह पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वांसाठी त्याची निर्मिती असल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांचा अधिक कल आहे. त्याद्वारेच त्यांना फॅन्सी डिझाइन, तसेच आकर्षक रंगाचे विविध स्वेटर पाहावयास मिळतात. ग्राहकांची पसंती जाणत त्यांना स्टॉलधारक त्यांना सेवा देण्यात दिवसभर व्यस्त असतात. सकाळी साडेनऊपासून रात्री दहापर्यंत स्वेटर आणि कानटोप्या खरेदीसाठी ग्राहक येतात. मुख्य बाजारपेठ व जागोजागी स्टॉल उभारून विक्री सुरु आहे. कामगार नेमून तीन महिन्यांसाठी हा व्यवसाय तेजीत असतो.

जुन्या लोकरीच्या स्वेटरचे महत्त्व

आजकालची तरुणाई थंडीपासून बचावासाठी फॅन्सी स्वेटर, कानटोप्यांकडे वळली असली, तरीही जुन्या लोकरीच्या स्वेटरचे महत्त्व कमी झाले नाही. त्यांना जाणकारांकडून आग्रही मागणी आहे. अत्यंत ऊबदार गुणधर्मामुळे ते विक्रीसाठी ठेवणे भाग आहे.

दरांवर एक दृष्‍टिक्षेप...

  • स्वेटर दर - साधारण २०० पासून ८०० पर्यत

  • कानटोप्या - साधारण ५० पासून १५० पर्यत

  • हॅन्डग्लोज - साधारण ७० पासून १२० पर्यत

  • मफलर - साधारण १०० पासून २०० पर्यत

  • जर्किन - साधारण ३५० पासून ६०० पर्यत

  • लहान मुलांचे स्वेटर - साधारण १५० पासून पुढे

    #ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT