Woman Beaten, Opponents Criticize Government 
पश्चिम महाराष्ट्र

महिलेला विवस्त्र करून मारहाण, विरोधकांनी केले पोलीस, सरकारला नागडे

सकाळ वृत्तसेवा

नगरः पोलिसात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पाथर्डी तालुक्‍यातील दाम्पत्याचे येथील जिल्हा रुग्णालयासमोरून अपहरण करण्यात आले. अज्ञात स्थळी नेऊन दोघांना विवस्त्र करून, अंगावर पेट्रोल टाकून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे चित्रीकरण "व्हायरल' करण्यात आले.

याबाबत पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून आज पहाटे तोफखाना पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे पीडितेचा सख्खा भाऊ, दीर, चुलत सासरे, चुलत दीर यांच्यासह 10 जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यातील पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

ते आरोपी पोलीस म्हणवून घेत होते
फिर्यादीनुसार, पाथर्डी तालुक्‍यातील दाम्पत्य 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाजवळ एका रिक्षात बसले. त्या वेळी रिक्षातील एकाने पीडिता व तिच्या पती काहीतरी हुंगवून बेशुद्ध केले. नंतर त्यांना अज्ञात स्थळी एका खोलीत बंद केले. पीडितेचा सख्खा भाऊ, दीर, चुलत सासरे, चुलत दीर यांच्यासह दहा जण तेथे आले. त्यांतील दोघे स्वत:ला पोलिस म्हणवून घेत होते.

निंबळक बाह्यवळण रस्त्यावर अपहरण 
दरम्यान, पीडित महिलेने 2015मध्ये अत्याचाराची फिर्याद दिली होती. पीडितेने याच आरोपींविरोधात विविध फिर्यादी दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत तिने म्हटले होते, की निंबळक बाह्यवळण रस्त्यावर अपहरण झाले. नंतर विवस्त्र करीत एका पोत्यात घालून मारहाण केली व रेल्वेमार्गावर टाकून दिले.

या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अहवाल जिल्हा पोलिसांनी आज दुपारी गृह मंत्रालयाकडे पाठविला आहे.

नातेवाईकच आहेत आरोपी 

या प्रकरणामुळे विरोधकांनी पोलीस प्रशासन व सरकारवरच्या निष्क्रीयतेवर आरोप करीत नागडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन केले. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि वस्तुस्थिती या फार तफावत आहे. वस्तुनिष्ठ अहवाल आला आहे.या प्रकरणात संबंधित महिलेचा भाऊ, वडील, भाचा, दीर आरोपी आहे. असे असले तरी या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT