पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून 

सकाळवृत्तसेवा

सातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

धनंजय दगडू खोत (वय 50) याच्यावर पत्नी वैशाली हिचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वैशाली या पती धनंजय, सासू भागीरथी, मुलगा विक्रांत, मुलगी सृष्टी यांच्यासोबत माची पेठेत राहत होत्या. रिक्षाचालक असलेल्या धनंजयला दारूचे व्यसन होते. व्यवसायातून आलेले सर्व पैसे तो दारूवर उडवायचा. यावरून वैशाली यांचा त्याच्याशी वारंवार वाद होत होता. त्यांची पिठाची गिरणी आहे. पिठाची गिरणी व पिकोफॉल करून त्या कुटुंबाचा खर्च चालवत होत्या. काल सायंकाळी धनंजयने त्यांच्याकडे पैसे मागितले. यावरून दोघांत वाद झाला होता. आज सकाळी सृष्टीने आईकडे पुस्तके आणण्यासाठी तीनशे रुपये मागितले. तेव्हा त्यांनी तिला दीडशे रुपये दिले व दीडशे रुपये वडिलांकडून घेण्यास सांगितले. त्यावरून धनंजयने त्यांना शिवीगाळ केली व तुला दाखवतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास सृष्टी महाविद्यालयात गेली. त्यानंतर भाऊही शाळेत गेला. 

दुपारी एकच्या सुमारास मुलगी घरी आली. त्या वेळी आई घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिला दिसले. त्यामुळे घाबरून ती आरडाओरडा करतच बाहेर आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काहींनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पोरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. मृतदेहाजवळ त्यांना रक्ताने माखलेली नारळ सोलण्याची छोटी पहार सापडली. चौकशीमध्ये धनंजय दुपारी घाईगडबडीत रिक्षा घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्याची रिक्षा चारभिंती परिसरात आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर वैशाली यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सृष्टीच्या फिर्यादीनुसार धनंजयवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT