The woman from Ruby hospital enters this village secreaty 
पश्चिम महाराष्ट्र

'रुबी'मधील महिलेने केला या गावात चोरून प्रवेश

सकाळवृत्तसेवा

आळसंद : पुणे येथून द्राक्षांची वाहतूक करणाऱ्या टेंपोमधून चोरून प्रवास करून आळसंद (ता. खानापूर, जि. सांगली) येथील एक महिला दोन दिवसापूर्वी गावात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीला मिळताच त्यांनी विटा येथील प्रशासनाच्या गोपनीय विभागाला त्याची माहिती दिली. प्रशासनाने चौकशी करून तिच्यासह कुटुंबातील चारजणांना होम क्वारंटाईन केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाबंदी आदेश लागू केला आहे. त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिलेविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला पुणे येथे रूबी हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याचे उघड झाले आहे. 

पुणे व मुंबई येथे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या भीतीने अनेकजण आता वेगवेगळ्या शक्कल लढवू लागले आहेत. आळसंद येथे आलेल्या महिलेने पुणे येथून आले नसून कासेगाव (ता. वाळवा) येथून आल्याचे खोटी माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीला सांगितली. समितीमधील अध्यक्ष, सचिव, पोलिस पाटील व सदस्यांना तिचा संशय आल्याने याबाबतची माहिती प्रशासनाच्या गोपनीय विभागाला दिली.

प्रशासनाने चौकशी केली असता. महिला पुणे येथून आल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोसेवाडी येथील तीन व भांबर्डे येथील दोन जणांना होम क्वारंटाईन केल्याचे तहसीलदार हृषीकेश शेळके यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT