Women Death Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

Women Death Case : महालिंगपूरममध्ये गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; सांगलीतील डॉक्टर ताब्यात, चार डॉक्टरांची नावेही निष्पन्न

कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपूरम येथे गर्भपात (Abortion Case) झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

महिलेच्या नातेवाईकासह डॉक्टरास (Doctor) पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले झालेले अर्भक चारचाकीत आढळले.

सांगली : कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपूरम येथे गर्भपात (Abortion Case) झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी मृतदेहासह सांगलीत येणाऱ्या नातेवाइकास ताब्यात घेतले. तसेच, सांगलीतील एका डॉक्टरलाही ताब्यात घेतले. याच्यासह जयसिंगपूर, कर्नाटकातील आणखी तीन डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा महालिंगपूरम ठाण्यात (Mahalingapuram Police Station) वर्ग केला आहे.

महिलेच्या नातेवाईकासह डॉक्टरास (Doctor) पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले झालेले अर्भक चारचाकीत आढळले. पोलिसांनी सांगितले, सांगली पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले. एका चारचाकीमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेऊन मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले.

नातेवाईकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की नाही याची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात केली तेथील डॉक्टर आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन डॉक्टरांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्यावरही गुन्हा नोंद केला आहे. आज सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपूरम येथे रवाना झाले आहेत. सोबत मृत महिलेचा नातेवाईक, डॉक्टरासही ताब्यात घेण्यात आले होते.

बनावट डॉक्टर समिती

गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बनावट डॉक्टर समितीचा विषय चर्चेत आला आहे. समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, ‘‘सांगलीत काही डॉक्टरांचे रॅकेट आहे का, याचा तपास व्हायला हवा. तसेच समितीमध्ये पोलिस, महापालिकेचे अधिकारी असतात. गेल्या काही वर्षांत समितीची बैठक झाली नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गांभीर्याने दखल घ्यायला हवी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT