पश्चिम महाराष्ट्र

बालदिन विशेष : बोलका सोहम बनलाय कमी वयाचा शब्दभ्रमकार! 

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील दमाणी विद्या मंदिरात तिसरीच्या वर्गात शिकणारा सोहम येमूल भारतातील कमी वयाचा शब्दभ्रमकार आणि कठपुतली आहे. आई सोनाली आणि वडील शाम येमूल यांच्या प्रोत्साहनातून सोहमची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सोहम बापूजींच्या कठपुतलीच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. 


सोहमची शब्दभ्रम कलेतील आवड पाहून वडील शाम यांनी त्याच्यासाठी खास विविध बोलक्‍या बाहुल्या आणि दोन कठपुतल्या बनविल्या आहेत. सध्या त्याच्याकडे छोटूसिंग पपेट, केक पपेट, मोदीजी पपेट, सोनुली पपेट, डायनासोर पपेट आणि बुक पपेट आहेत. तसेच पोवाडा गाणारा कठपुतली, शाळेला जाणारा छोटू कठपुतली आणि महात्मा गांधींच्या वेशातील कठपुतली सुद्धा आहे. 

सोहम हा सोलापुरातील विविध गणपती मंडळ, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात गेल्या तीन वर्षांपासून आपली कला सादर करीत आहे. मनोरंजनासोबत आपल्या शब्दभ्रम कलेतून सोहम विविध सामाजिक संदेश देत असतो. लहान वयातील त्याच्या कलेच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली असून त्याला मेडल, सर्टिफिकेट, बॅच, 2019 या वर्षाचे रेकॉर्ड बुक आणि अचिव्हर आय कार्ड बक्षीस म्हणून पाठविण्यात आले आहे. 

सोहम वक्तृत्व कलेत उत्तम आहे. त्याला आजवर जिल्हा, राज्य आणि आंतर शालेय स्तरातील विविध पुरस्कार मिळाले आहेत. शब्दभ्रम कार्यक्रमासोबत सोहम जादूचे प्रयोग दाखविणे, स्वच्छ भारत अभियानसाठी सादरीकरण, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी भोंदू बाबा अभिनय कार्यक्रम, हास्यसम्राट दीपक देशपांडे यांचा हॅलो ताई मिमिक्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडाही तो उत्तमरीत्या सादर करतो. 
-- 
यांच्याकडून मिळतेय मार्गदर्शन, प्रोत्साहन... 
वयाच्या चौथ्या वर्षापासून सोहमला शब्दभ्रम कलेत आवड निर्माण झाली. तो लहानपणापासूनच जागतिक कीर्तीचे भारतातील ज्येष्ठ शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे व्हिडिओ पाहायचा. तसेच सोलापूरचे प्रसिद्ध जादूगार आणि शब्दभ्रमकार गुरुराज मिरजी यांच्याकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आहे. कुटुंबीयांसोबतच श्री म. फ. दमाणी प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका निर्मला भोसले आणि इतर शिक्षकांकडूनही सोहमला प्रोत्साहन मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT