Work on Bijapur-Guhagar highway started at a snail's pace 
पश्चिम महाराष्ट्र

विजापूर-गुहागर महामार्गाचे काम कासवगतीने सुरू

संजय गणेशकर

पलूस : पलूस मार्गावरून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम इतर ठिकाणच्या महामार्गाचे तुलनेत कासवगतीने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग समिती, खासदार या महामार्गाच्या कामाबाबत सतर्क नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. खराब रस्त्यावरुन किती दिवस प्रवास करायचा, असा सवाल विचारला जात आहे. महामार्गाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींनी जनतेच्या उद्रेकाला सामोरे जायच्या अगोदर महामार्गाचे काम तात्काळ पुर्ण करावे, अशी मागणी होत आहे. 

विजापूर- गुहागर महामार्ग सुरू होणार म्हटल्यावर सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात होते. कामही झपाट्याने सुरू झाले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू झाले. त्यामुळे शेतकरी रस्त्याची हद्द, नुकसान भरपाई यावरुन न्यायालयात गेले. त्यांना वेळीच विश्वासात घेऊन नियमानुसार हद्द कायम करून घेतल्या असत्या व नुकसान भरपाई दिली असती तर महामार्गाचे काम रखडले नसते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात महामार्गाचे अधिकारी पूर्णपणे अयशस्वी ठरले, असेच म्हणावे लागेलर्.च्या कामाला आमचा विरोध नाही. नियमानुसार हद्द कायम करून भरपाई द्या. अशी मागणी आहे. याच प्रश्नांवरून बराच कालावधी निघून गेला. तोपर्यंत रस्त्याचे काम रखडले. विशेषतः तुपारी फाटा ते येळावी फाटा येथे महामार्गाचे काम अजिबात झाले नाही. आहे त्या रस्त्याची अतिशय दैना झाली. 

महामार्गाचे काम तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान पूर्वीप्रमाणे होणार नाही. रुंदीकरण, कॉंक्रीटीकरण होणार नाही. पुर्वीचे निविदा रद्द करण्यात आली. जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यान कोणत्याही प्रकारे रूंदीकरण न करता पुर्वीप्रमाणे रस्ता डांबररीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पलूस तालुक्‍यात महामार्ग व जुना रस्ता पुर्वीसारखाच राहणार आहे. या प्रक्रियेत रस्त्याची वाताहत झाली. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अपघात तर नित्याचे झाले आहेत. त्याचे सोयरसुतक ना खासदार, ना लोकप्रतिनिधी आणि महामार्गाचे अधिकाऱ्यांना आहे. 

प्रस्ताव धूळखात 
तुपारी फाटा ते येळावी फाटा दरम्यानचा डांबरिकरणाचा प्रस्ताव सुध्दा मुंबई मध्ये धुळखात पडला आहे. निदान तो प्रस्ताव मंजूर होऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे. अशी मागणी होत आहे. 

खासदारांनी लक्ष घालावे 
विजापूर - गुहागर मार्गाचे काम पलूससह तासगाव हद्दीत रखडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्ता खराब आहे. खासदार संजय काका पाटील या रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावावी, अशी मागणी आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT