Work on Ghatnandre from CM drinking water scheme started at a fast pace 
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री पेयजल योजनेतून घाटनांद्रेत काम गतीने सुरू 

हिरालाल तांबोळी

घाटनांद्रे : येथे मंजूर एक कोटी सतर लाख रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ंपिण्याच्या शुद्ध पाण्याच्या योजनेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. गावात पाईपलाईन बसवण्याचे काम सुरु झाले आहे. 

याबाबतची माहिती अशी, की माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार संजय पाटील यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांमार्फत घाटनांद्रेसाठी पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी योजना मंजूर केली होती. एक कोटी सतर लाख रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. योजने अंतर्गत रायवाडी तलावाशेजारी विहीर खोदली जाणार आहे. त्यालगत जॅकवेल व पंपहाऊस बसवण्यात येणार आहे. 

तेथून साधारणपणे आठ - नऊ किलोमीटरवर बंदिस्त पाईपलाईनद्‌वारे घाटनांद्रेत पाणी आणून शुद्धीकरण करुन टाकीत टाकून ते पाईपलाईनद्‌वारे घरोघरी पुरवले जाणार आहे. गावात नवीन पाण्याची टाकी, शुद्धीकरण व पंप हाऊस उभारले जाणार आहे. योजनेसाठी गावात पाईप येऊन पडल्या आहेत. गावांतर्गत पाईप लाईन टाकण्याचे कामही सुरु आहे. रायवाडी तलावाशेजारी जॅकवेल व पंपहाऊसचे बरेच काम मार्गी लागले आहे. योजनेमुळे गावाला शुध्द व मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. जनतेत समाधानाचे वातावरण आहे. 

खासदार संजय पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने योजना पुर्णत्वाकडे जात आहे. गावाला लवकरच भरपूर व शुद्ध पाणी मिळणार आहे. 
- अनिल शिंदे, माजी उपसभापती 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT