Work on Lingayat cemetery wall in Mangle has been incomplete  
पश्चिम महाराष्ट्र

मांगलेत लिंगायत दफनभूमी भिंतीचे काम दोन वर्षापसून अर्धवट 

भगवान शेवडे

मांगले : येथील लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम दोन वर्षापसून अर्धवट स्थितीत आहे. शासनाच्या 25/15 योजनेतून मंजूर कामासाठी निधी नसल्यामुळे काम अर्धवट स्थितीत आहे. झालेल्या कामाची बिले मिळाली नसल्यामुळे पुढील काम ठेकेदाराने थांबवले आहे. 

मंजूर कामाचा निधी उपलब्ध कसा होत नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे. कामाबाबत विचारणा केल्यानंतर ठेकेदार सकारात्मक उत्तर देत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनाही लोकांनी काम ठेकेदाराने थांबवल्याचे अनेकवेळा सांगितले. मात्र तालुक्‍याचे अधिकारीही सकारात्मक उत्तरे देताना दिसत नाहीत. 

निधी नसल्यामुळे काम थांबले आहे, असे अधिकारी वा ठेकेदार सांगू शकत नाहीत. त्यामुळे काम आहे त्या स्थितीत थांबवले आहे काय ? अशी शंका लोकांना येवू लागली आहे. दफनभूमीच्या संरक्षक भिंतीच्या कामाची 28 फेब्रुवारी 2019 ला निविदा निघून काम कामाला सुरुवात झाली होती. माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सुमारे तीन लाख 34 हजार रुपये कामासाठी मंजूर झाले आहेत. हे काम तीन महिन्यात पूर्ण करायचे होते. मात्र आज दोन वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही. 

25/15 योजनेतून सदरचे काम मंजूर आहे. ठेकेदाराने स्वतःच्या जबाबदारीवर काही प्रमाणात काम पूर्ण केले. त्याची बिले त्यांना दिली आहेत. मात्र योजनेसाठी निधी नसल्यामुळे काम रखडले आहे. ठेकेदाराला काम पूर्ण करण्याबाबत सांगितले, मात्र अगोदरची बिले मिळाली नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचण आली. महिनाअखेरपर्यंत निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. निधी उपलब्ध होताच प्राधान्याने काम पूर्ण करण्यात येईल. 

- अतुल केकरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT