Work on three bridges near Sangli is now in full swing 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली लगतच्या तीन पुलांच्या कामांना आता गती

जयसिंग कुंभार

सांगली : सांगली लगतच्या तीन पुलांच्या कामांनी आता गती घेतली आहे. पुढील महिनाभर आयर्विन पूल दुरुस्ती-डागडुजी कामासाठी बंद राहणार आहे. हरिपूर-कोथळी पूलाचे कामाने आता गती घेतली असून पावसाळ्यापुर्वी हे काम पुर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. तर आयर्विनला पर्यायी अशा बंधाऱ्यालगतच्या नियोजित पूलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सांगलीवाडीत पुढील आठवड्यात मोजणी करून शेतकऱ्यांना भूमीसंपादनाच्या नोटीशी दिल्या जाणार आहेत. 

याबाबत शाखा अभियंता एस. एस. मुजावर म्हणाले,""पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडीट पुर्ण झाले आहे. पुलाची स्थिती मजबूत आहे. किरकोळ परंतु गरजेच्या अशा डागडुजीसाठी पूल बंद ठेवला आहे. त्यामध्ये पूला पदपथाच्या अँगलचे वेल्डींग, झाडेझुडपे काढणे, दोन्ही बाजूच्या पदपथाचे स्लॅब अशी कामे आहेत. पुलावरील वापरात नसलेली पाण्याची पाईपलाईन काढून घ्यावी यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. काम सुरु असताना अपघाताची शक्‍यता विचारात घेऊन वाहतूक पुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. महिनाभरात पूल पुर्ववत वाहतुकीसाठी खुला होईल.'' 

मुजावर म्हणाले,""हरिपूर-कोथळी पूलाचे कामाने गती घेतली आहे. हरिपूर हद्दीतील किरकोळ भूमीसंपादन बाकी आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. सध्या या पुलासाठी संलग्न रस्त्यांचे भूमीसंपादन होणार नाही. हरिपूर स्मशानभूमीजवळ अंकली रस्त्याला पूलाचा उतार जोडला जाईल एवढेच काम सध्या होणार आहे. हरिपूर-अंकली रस्त्याच्या डांबरीकरणाची निविदा मंजूर झाली असून त्या कामाला लवकरच सुरवात होईल. मात्र या रस्त्याचे रुंदीकरण सध्या होणार नाही. या रस्त्याची रुंदी तीस मीटर रेकॉर्ड आहे.'' 

आयर्विनला पर्यायी नव्या पुलासाठी प्रशासकीय कार्यवाही गतीने सुरु आहे. याबाबत महापालिका उपायुक्त दत्तात्रय गायकवाड म्हणाले,""सांगलीवाडी हद्दीत या रस्त्यासाठी शंभर फुट रुंदीने भुमीसंपादन होणार आहे. त्यासाठी ड्रोन सर्व्हे झाला आहे. फाळणी नकाशे, सातबारा उतारे तयार करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मोजणीच्या कामास आठवडाभरात सुरवात होईल. खांब लावले जातील त्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना भुमीसंपादनासाठी नोटीशी बजावल्या जातील.'' 

वाहतूक प्रथमच प्रदीर्घकाळ बंद.... 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगलीकरांच्या सेवेत असलेल्या आयर्विन पुलावरील वाहतूक प्रथमच प्रदिर्घकाळ बंद ठेवण्यात येत आहे. पुलाच्या पदपथाचे अँगल गंजले आहेत. त्यामुळे स्लॅब निखळून पडत आहे. त्यासाठी अद्ययावत अशा इपॉक्‍सी ट्रीटमेंटचा वापर केला जाणार आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT