पश्चिम महाराष्ट्र

दीड लाखांच्या खंडणीसाठी कामगारास मारहाण

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शाहूपुरीत भरदिवसा दीड लाखांच्या खंडणीची मागणी करत परप्रांतीय कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. गोपाळ गणाराम मेघवाल (वय ३५, मूळ रा. राजस्थान, सध्या शाहूपुरी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संशयित चेतन कवाळे (रा. राजारामपुरी) आणि अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. 

शहाजी लॉ कॉलेजजवळ जसवंत स्वीट नावाचे दुकान आहे. दुकानात गोपाळ मेघवाल काम करतात. काल दुपारी मेघवाल हे दुकानात काम करत होते. त्या वेळी दुकानात संशयित चेतन कवाळेसह चार तरुण आले. त्यांनी दुकानात खाद्यपदार्थ घेतले. त्यातील एक जण प्याल्याचे जाणवत होते. खाद्यपदार्थ खात असताना संबंधित तरुणाला उलटी झाली. तसा चेतनने माझ्या मित्राला उलट्यांचा त्रास होत आहे. जर त्याला रुग्णालयात दाखल केले तर पोलिसांत तक्रार देईन, असे म्हणत त्याने मेघवाल यांच्याकडे दीड लाखाच्या खंडणीची मागणी केली; पण हे पैसे देण्यास मेघवाल यांनी नकार दिला. याचा चेतनला राग आला. त्याने त्यांच्या तोंडावर मारहाण केली. त्यानंतर दोघे जण पसार झाल्याची फिर्याद जखमी मेघवाल यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. मेघवाल यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत चेतनसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT