rail track.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

श्रमिक रेल्वेतून उत्तर प्रदेशचे मजूर सुखरूप रवाना ...लवकरच येथेही मजूर जाणार

सकाळवृत्तसेवा

मिरज- कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर लाॅक़डाऊन काळात अडकून पडलेल्या मिरज तालुक्यातून उत्तरप्रदेश येथील परप्रांतिय मजुरांसाठी चार श्रमिक रेल्वे धावल्या यामधून सुमारे पाच हजार परप्रांतिय मजुर आपल्या मुळगावी रवाना झाले. तर बिहार आणि मध्यप्रदेशातील नागरिकांची गावी परतण्यासाठी आॅनलाईन अर्ज केल्यामुळे पुढील काही दिवसात बिहार आणि मध्यप्रदेशसाठी प्रत्येकी एक-एक रेल्वे धावणार असल्याचे तहसिलदार रणजीत देसाई यांनी मत व्यक्त केले. 


मिरज तालुक्यात सुरू केलेल्या सुविधा केंद्रांवर बिहार आणि मध्यप्रदेशातील नागरिाकांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. सध्या महापालिका परिसरात औद्योगिक कंपन्या (एमआयडीसी ) येथील कंपनीमध्ये हजारो कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी आले होते. तर यामधील काही कामगार मिरज तालुक्यात सुरू असलेल्या राज्यमार्ग, राष्ट्रीय राज्यमार्ग या कामासाठी दाखल झाले होते. 
मात्र कोरोना रोगामुळे लागू केलेल्या लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे या कामगारांना उपासमारीची वेळ निर्माण होऊ झाल्यामुळे अखेर परप्रांतिय कामगारांनी मिळेल त्या मार्गे उत्तरप्रदेशमध्ये जाण्यासाठी धडपड सुरू केल्यामुळे अखेर मंत्री विश्वजीत कदम यांच्या सहकार्याने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक रक्कमेची तरतूद करून विशेष श्रमिक रेल्वेतून सुमारे चार हजारहून अधिक परप्रांतियांची घऱी जाण्याची सोय करण्यात आली. 15 रोजी शेवटची विशेष श्रमिक रेल्वे रात्री रवाना झाली.


रवाना झालेली विशेष श्रमिक रेल्वे उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर, रावी या ठिकाणी थेट जाणार असल्यामुळे प्रशासनाकडून त्यांना प्रवासा दरम्यान जेवन पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या शिवाय अन्न पदार्थांची पाकीटे देखिल देण्यात आली होती. उत्तरप्रदेशमध्ये पोहचल्यानंतर या कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे येथील एका उच्च शिक्षित प्रवाशाने सांगितले. तसेच परप्रांतिय नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष श्रमिक रेल्वे गाडीची सोय केल्यामुळे सर्व प्रवाशांच्या चहे-यावर आनंद ओसाडून वाहत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT